इगतपुरी – अंगावर वीज पडून २४ वर्षीय युवती जागीच ठार 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथे रविवारी सायंकाळी वीज पडून २४ वर्षीय युवती जागीच ठार झाली आहे. पुजा त्र्यंबक भांगरे असे दुर्दैवी युवतीचे नाव आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने घराजवळच्या शेतावर काम करत असताना सायंकाळी सहाच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. यावेळी पुजा भांगरे ही अंगनात वाळत घातलेल्या पापड्या कुरड्या काढत असताना  विज पडुन तीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

error: Content is protected !!