प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात शनिवारपासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे महामार्गानजीकच्या पाडळी देशमुख गावाकडे जाणाऱ्या रेल्वेपुलाखालील पाणी निघत नाही. त्यामुळे पाडळी देशमुख गावचा व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांसह मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले. मात्र येथे येणाऱ्या पाण्याला निघण्यासाठी अगदी छोटी मोरी टाकल्याने बाहेरून येणारे पाणी निघत नाही. परिणामी येथे पाण्याचा तुंब बसुन पुलाच्या दोनही बाजुपर्यंत पाणी पांगल्याने पायी जाणे तर सोडा वाहनधारकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक वाहने रस्त्याच्या बाजूला लाऊन दिले जात आहे. यामुळे पाडळी देशमुख गावकऱ्यांसह व पुढे जाणाऱ्या शेणवड खुर्द, गरुडेश्वर व १२ वाड्या तसेच पंचक्रोशीतील गावांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुकणे येथे शाळेत जाणाऱ्या गावांतील शालेय विद्यार्थ्यांचा जाण्या-येण्याचा प्रश्न निर्माण झाला असुन रेल्वे प्रशासनाने येथील मोरी काढुन पाणी निघण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी इगतपुरी तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे, सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, महेश धांडे, रतन धांडे, दिनेश धोंगडे, रामभाऊ धोंगडे, बाळासाहेब धांडे, नितीन धांडे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group