५ दिवसातच इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांच्याकडून अवकाळीग्रस्त शेतकऱ्याला मिळाली ३७ हजार ५०० नुकसानभरपाई : सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज – मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे घोटी खुर्द येथील शंकर यशवंत निसरड यांचे घर कोसळले होते. या घटनेत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि एका म्हशीचा मृत्यू झाला होता. इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन तलाठी, मंडळ अधिकारी यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शंकर यशवंत निसरड ह्या पीडित शेतकऱ्याला […]

सलगच्या अवकाळीने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : सरसकट विमा मंजूर करून नुकसान भरपाई द्या – इंदिरा काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतात कापणी केलेल्या भाताचे व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भिजलेल्या भाताला मोड फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनस्तरावर याची दखल घेऊन शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा मंजुर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आमदार हिरामण […]

मुकणेच्या आवर्तनामुळे कुऱ्हेगावला भातपिकांचे नुकसान : शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा धरणावर झोपा काढो आंदोलनाचा छावा क्रांतिवीर सेनेचे गोकुळ धोंगडे यांचा इशारा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील शेतकऱ्यांना पूर्व कल्पना न देताच मुकणे धरणाचे आवर्तन सोडले. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून ठेवलेल्या भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकरी संकटात आले आहेत. मुकणे धरणाचे शाखाधिकारी विजय ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मात्र शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांविषयी […]

वादळी पावसाने घोटी खुर्द येथे घर पडले ; १ म्हैस ठार, अनेक शेळ्या जखमी, जीवितहानी नाही : पीडित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या – सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात घोटी खुर्द येथे अवकाळी वादळी पावसामुळे दगड मातीचे बांधकाम असलेले कौलारू घर पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुधाळ म्हैस जागीच ठार झाली असून अनेक पाळीव शेळ्या गंभीर जखमी झाल्या. घरात उभ्या केलेली मोटारसायकल पडलेल्या घरात दाबली गेल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले. घरातील अन्न धान्य, संसारोपयोगी साहित्याचे मोठे […]

अवकाळीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्या : काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जयराम धांडे यांची मागणी

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अधुन-मधुन बरसणाऱ्या जोरदार गारांच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकरी आधीच सावरलेला नाही. त्यात दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पुनःश्च मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी व बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या टोमॅटो, कांदे, मिरची, फ्लॉवर, कोबी, भोपळा, वांगे आदी बागायती पिकांसह गहु, जनावरांचा चारा […]

अवकाळीने तालुका झोडपला, पंचनामे अकरा गावचेच का ? : इंदिरा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने गेल्या दोन महिन्यापासून कंबरडे मोडले असुन सोमवारी वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन भाजीपाल्यासह पोलिओ हाऊस, शेडनेट केलेल्या शेती नेस्तनाबूत झाल्या आहेत. म्हणून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवुन द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ, […]

अवकाळीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या : इगतपुरी तालुका मनसेचे तहसीलदारांना निवेदन 

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११ – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी सायंकाळच्या सुमारास साकुर, साकुर फाटा, पिंपळगाव मोर, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, तातळेवाडी, […]

“स्वराज्य” जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्या नेतृत्वाखाली अवकाळीग्रस्त भागाची पाहणी : बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती यांच्या आदेशाने संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्या पथकाने इगतपुरी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी हजर होते. बळीराजाची परिस्थिती अतिशय वाईट झालेली असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. स्वराज्यच्या मावळ्यांनी आज तालुक्यातील सर्व […]

नांदगाव बुद्रुक, साकुर परिसरात अवकाळी नुकसानग्रस्त भागात आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पाहणी : नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरीच्या पूर्व भागातील नांदगाव बुद्रुक, साकुर भागात रविवारी झालेल्या जोरदार गारांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बागायती पिकांसह, ऊस, गहू, कांदा, मका, पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. याबाबत माहिती कळताच इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी […]

पिकविम्यासह शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या : कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ –इगतपुरी तालुक्यातील मुख्य भाताचे अवकाळीने मोठे नुकसान झाले असून पीकविमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नाही. विम्याचा लाभ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांना केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. पालकमंत्री ना. भुसे यांनी योग्य […]

error: Content is protected !!