
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उद्या 13 जुलैला घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिकेवर राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार
आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्त स्थगित करण्यात आला आहे. यासंदर्भात सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.