इगतपुरीनामा न्युज, दि. ११
पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात शेतीत पाणीच पाणी झाले आहे. भातलागवडीचे कामे रखडली आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा विद्युत मंडळाने खंडित केल्याने नागरिकांना गढूळ व दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष घालावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक दादाभाऊ शिरसाठ यांनी केली आहे.. इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. आज दिवसभरात इगतपुरीत १२६६ मिलिमीटर पाऊस झाला असून अस्वली स्टेशनच्या पूर्वभागात ४३५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जास्त पावसाने दारणा धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दारणा धरणातून १४ हजार क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू असुन दारणा धरणात ४ हजार ८०५ दश लक्ष घनफुट इतका पाणी साठा असून धरण ६९ टक्के भरले असल्याची माहिती दारणा धरणाचे शाखा अभियंता एस. एम. जाचक यांनी दिली. गेल्या २ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने भात शेतीत मोठ्या प्रमाणात खाचरात मोठया पाणी साचले आहेत. परिसरातील नदी नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर भातलागवडीचे कामेही रखडणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या विद्यत पुरवठा बिले न भरल्याने ऐनपावसाळ्यात खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना गढूळ दूषित पाणी प्यावे लागते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कामे बंद आहेत. शेतात पाणी जास्त प्रमाणात साचल्याने भातलागवड सुरु नाही. बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आहे. विजेचा खेळखंडोबा आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना वीज खडित असल्याने नागरिकांना गाळ मिश्रित पाणी प्यावे लागते. याकडे तालुका प्रशासन आणि आरोग्य खात्याने लक्ष द्यावे.
- दादाभाऊ शिरसाठ, तालुका निरीक्षक वंचित बहुजन आघाडी