इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या बेलगाव कुऱ्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विजय कचरू बोराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सत्यभामा गेणु गुळवे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. बिनविरोध निवडीची घोषणा होताच समर्थकांनी आनंद व्यक्त केला.
आज बेलगाव कुऱ्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक तथा जेष्ठ नेते ऍड. संदीप गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडणूक पार पडली. लोकनियुक्त सरपंच नंदराज गुळवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक किरण आहिरे यांनी कामकाज पाहिले. उपसरपंच पदासाठी विजय कचरू बोराडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांनी विजय बोराडे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. याप्रसंगी कोविड नियमांचे पालन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता समर्थक आणि गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी मावळत्या उपसरपंच सत्यभामा गेणु गुळवे, गेणु दादा गुळवे, नामदेव बोराडे. स॑जय बोराडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजु बोराडे, कोंडाजी गुळवे, दिलीप गुळवे, समाधान गुळवे, दत्तु धोंगडे, गौरव गाडे, पोपट बोराडे, गणेश बोराडे, किरण बोराडे, नामदेव गुळवे, बाजीराव गोहाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. गावकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून अखंड ग्रामसेवा करण्याचा शब्द नूतन उपसरपंच विजय बोराडे यांनी दिला. जेष्ठ नेते ऍड. संदीप गुळवे यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.