इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – २५० किलोमीटरचा प्रवास करीत “साईनाथ महाराज की जय”चा जयघोष करीत मुंबई येथून निघालेल्या साई भक्तांच्या पदयात्रेचे इगतपुरी येथील शिवाजी नगर येथे श्वेता पवार यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले. तीस वर्षांपासून मुंबईच्या ओम श्री साई सेवक मंडळातर्फे रामनवमी निमित्त दरवर्षी शिर्डी पदयात्रेचे आयोजन केले जाते. रामनवमी महोत्सवाच्या दिवशी साईबाबांच्या चरणी सेवा अर्पण करत तेथे ही पालखी पोहोचते. चार ते पाच दिवस पायी प्रवास करत साईनामाचा जयघोष केला जातो. अतिशय शिस्तबद्ध असलेल्या हजारो पालख्या व लाखो साई भक्त रस्त्याने जातांना भक्तिमय वातावरण निर्माण करतात. इगतपुरी येथील शिवाजीनगरच्या नागरिकांनी साई पालखीचे स्वागत केले. साईबाबांची मूर्ती अन चांदीची पादुकांना दूध व तुपाचा अभिषेक करून रात्री महाप्रसाद करण्यात येतो. यावेळी प्रभूनयन फाऊंडेशन व श्री साई सहाय्य समितीतर्फे साई भक्तांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात आले होते. आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. प्रभूनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवाणी, दीपा मवानी, डॉ. मनोहर पाटील, डॉ. संगीता पाटील, डॉ. जान्हवी यादव, श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर, श्वेता यादव, अनुजा यादव, रश्मी यादव, वर्षा यादव ,स्वप्नाली मस्के, सागर जाधव, सुमित बोधक, प्रमोद डेंगळे, चैतन्य अहिरे, गौरेश राऊत, कार्तिक यादव, गौतमी राऊत, गीता राऊत आदी उपस्थित होते
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group