अज्ञात वाहनाच्या धडकेत नांदूरवैद्य येथील २८ वर्षीय युवक ठार

इगतपुरीनामा न्यूज – आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलीला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रायगड नगर जवळ वालदेवी पुलाजवळ घडली. ह्या अपघातात देविदास रावसाहेब मुसळे वय २८, रा. नांदूरवैद्य, ता. इगतपुरी हा युवक ठार झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी […]

निवडणूक आयोग आणि ईव्हीएमविरोधात लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीत काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमविरोधातील लढा सुरूच ठेवला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदिवासी सेलचे नेते लकीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज इगतपुरी तहसीलदार कार्यालयात निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटाळा केला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे […]

प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंप्री सदो जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभक्ती गीतांवर नृत्य, बेटी बचाओ बेटी पढाओसह उपक्रमांनी प्रेक्षकांना भावूक केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर कार्यक्रम सादर केले. यावेळी केंद्रप्रमुख संजय बोरसे, उपसरपंच शहनाज शेख, फिरोज शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अमजद पटेल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबलू उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती […]

टिटोली येथे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा

इगतपुरीनामा न्यूज – ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त टिटोली येथे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती सदस्या अनिता हाडप यांनी, ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण उपसरपंच माया भडांगे यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून शाळेची यशोगाथा मांडण्यात आली. टिटोली ग्रामपंचायत व ड्यु ड्रॉप्स रिसॉर्ट यांचे उपक्रमांसाठी सहाय्य लाभले. मागासवर्गीय […]

श्री स्वामी समर्थ सूतगिरणी प्रकल्पात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न : मार्चमध्ये सूतगिरणीचा होणार दिमाखात शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज – श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरी येथे आज मोठ्या उत्साहात ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. व्यवस्थापकीय संचालक सुहास राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सूतगिरणीचे संस्थापक हातकणंगलेचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश सर्वांना वाचून दाखवण्यात आला. येत्या मार्चमध्ये मोठ्या दिमाखात श्री स्वामी […]

चांगला आहार मिळाल्यास क्षयरोगावर मात करणे शक्य : डॉ. विश्वनाथ खतेले : बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण जनजागृती

इगतपुरीनामा न्यूज – क्षयरोग दुर्धर आजाराचा उपचार सहा महीने प्रदिर्घ आहे. उपचारादरम्यान चांगला आहार मिळाल्यास प्रतिकार शक्ती वाढून आजारावर मात करणे शक्य आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी क्षयरोग रुग्णांसाठी पुढाकार घेऊन मदत करावी असे आवाहन बेलगाव कुऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ खतेले यांनी केले. इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली […]

इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न : फांगुळगव्हाण येथे विद्यार्थ्यांकडून शिबीर काळात विविध उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबीर फांगुळगव्हाण येथे संपन्न झाले. १९ ते २५ जानेवारी या कालावधीत आयोजित ह्या शिबीरात युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा […]

प्रजासत्ताक दिनाला शाळा कॉलेज किंवा अंगणात काढा सुंदर रांगोळी, अंगण दिसेल अधिक सुंदर..!

किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज – दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. देशात सगळीकडे प्रजासत्ताक दिवसाची जोरदार तयारी सुरु आहे. शाळा, कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्वतंत्र भारतात लोकशाहीची स्थापना झाली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला इतिहासामध्ये विशेष महत्व आहे. आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाला शाळा कॉलेजच्या अंगणात काढण्यासाठी […]

घोटी महामार्ग पोलीस केंद्रातर्फे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान : वाहनचालकांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन आणि सुरक्षेचे प्रात्यक्षिक

इगतपुरीनामा न्यूज – महामार्गासह सर्वच रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या निमित्ताने सर्वांना योगदान देण्याची संधी देण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. यानुसार महामार्ग पोलीस केंद्र घोटी यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग ३ येथे रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिग्नलचे पालन करा, गाडी चालवतांना मोबाईलवर बोलू नका, मद्यपान करून गाडी चालवू […]

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांचा राष्ट्रपती पदकाने उद्या २६ जानेवारीला होणार गौरव

इगतपुरीनामा न्यूज – ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. उद्या प्रजासत्ताकदिनी सुरेश मनोरे यांना सन्मानपूर्वक पदक देऊन गौरव होणार आहे. विशेष पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी यापूर्वी घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात […]

error: Content is protected !!