इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. शैलेश देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील शेकडो रुग्णांना दिलेल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव समजला जात आहे. इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध गावांतून सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी डॉ. शैलेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे. वैद्यकीय आघाडीच्या […]
लेखक – प्रा. कमलेश रमेश दंडगव्हाळ, सहाय्यक प्राध्यापकगो. ए. सोसायटीचे सर डॉ. एम. एस. गोसावी औषध निर्माण महाविद्यालय नाशिक GPAT किंवा ग्रॅज्युएट फार्मसी टेस्ट ही एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जीएनटीए ( नॅशनल टेस्टिंग एजन्सी ) द्वारे मास्टर्स इन फार्मसी ( एम. फार्म ) किंवा भारतातील इतर कोणत्याही समकक्ष प्रोग्राम प्रवेशांसाठी दरवर्षी घेतली जाते. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीने शिक्षण क्षेत्रात दर्जेदार शिक्षणातून व सामाजिक प्रगतीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ह्याच सामाजिक दायित्वाचे पुढचे पाऊल म्हणजे ह्या संस्थेद्वारे एका अद्ययावत हॉस्पिटलची स्थापना नव्या वर्षात होत आहे. नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारीला ह्या हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाचे उदघाटन प्रसिद्ध बाल शल्यचिकित्सक व मुंबई विद्यापीठाच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – स्वदेस फाऊंडेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण इगतपुरी यांच्या सहकार्याने इगतपुरी तालुक्यातील कर्णदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर संपन्न झाले. घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणधिकारी निलेश पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, डॉ. अविनाश गोरे आदींच्या मार्गदर्शनाने हे शिबिर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – २३ ते २५ डिसेंबर पर्यंत नाशिकच्या रॉयल रायडर्सकडून राईडचे आयोजन करण्यात आले. नाशिक मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांच्या हस्ते शुक्रवारी निमाणी बस स्टॉप येथून झेंडा दाखवून सुरुवात झाली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या राईडमध्ये ७५ सायकलिस्ट सहभागी झाले. यात १३ वर्षाच्या स्वराज कराले याच्यासह ७ महिला आणि […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – मदतीची गरज असतांना समाजाकडून डोळेझाक झाल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडल्याने शेवटचा टोकाचा मार्ग पत्करायला निघालेल्या युवकाला जगण्याचा मोठा आधार लाभला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा इगतपुरी तालुक्याचे आरोग्यदूत गोरख बोडके यांच्या मदतीने अपघातग्रस्त वीज कर्मचारी अमोल जागले या युवकावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. ह्या कामासाठी मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील व्हीटीसी फाटा ते रायगडनगर ह्या गावापर्यंत मुंबई आग्रा महामार्गावरील दोन्ही बाजुंचा प्लास्टिक कचरा जमा करून स्वच्छता करण्यात आली. ह्या परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा मुक्या जनावरांकडून खाल्ला जात असल्याने त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. यासह ह्या प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 27 सकस आहाराने शरीराचे पोषण तर चुकीच्या आहाराने अनेक रोगांना सामोरे जावे लागते. उत्तम आरोग्यासाठी दररोज संतुलित आहार, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेची आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मोफत महाआरोग्य शिबिरातून गोरगरिबांना लाभ होत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व फिजिशियन डॉ. अतुल वडगांवकर यांनी केले. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेच्या तलावात मेलेले तरस आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या चार दिवसांपासून तलावात तरस पडले असल्याचा लोकांचा कयास आहे. या प्रकारामुळे इगतपुरी नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर चव्हाट्यावर आला आहे. घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर नगरपरिषदेचे जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी राहत असूनही मेलेले तरस आढळले. याच […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या सुचनेनुसार इगतपुरी आणि घोटी ग्रामीण रुग्णालयात शालेय नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील 74 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 57 विद्यार्थ्यांध्ये दृष्टीदोष असून चष्म्यासाठी संदर्भित करण्यात आले. त्यांना 3 डिसेंबरला चष्मे वाटप होणार आहेत. 17 विद्यार्थ्यांमध्ये तिरळेपणा […]