इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गोवंशातील जनावरांना लंपी आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाले आहे. गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, उपसरपंच शोभा राजाराम नाठे, गणपत जाधव, कचरु धोंगडे यांच्या हस्ते आज लसीकरण सुरु करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश नेहते, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 आपली पितरे अर्थात पूर्वजांची कृतज्ञता आणि आराधना करण्यासाठी पितृपक्षात त्यांना भोजन देण्याची सर्वत्र पद्धत आहे. काळानुरूप त्यामध्ये बदल होऊन अनेक पायंडे पडले आहेत. त्यानुसार पितृऋणातुन मुक्त होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी स्तुत्य काम केले आहे. त्यांचे वडील स्व. देवराम बोडके यांच्या पितृदिनाच्या निमित्ताने मोडाळे येथील जिल्हा परिषद शाळेला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून सकस आहारआणि परिपूर्ण पोषण कसे करावे ह्यासाठी घोटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नं. २ येथे रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता. मुलांना पालकांना सकस आहार कोणता द्यावा, कोणते पदार्थ दिले म्हणजे प्रथिने, जीवनसत्व, पिष्टमय पदार्थ मिळतात. यासोबतच स्वच्छतेचे महत्व व आरोग्याची घ्यावयाची काळजी याबाबत […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील निनावी येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या दृष्टिकोनातून बाहेरील जगाचे ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त होऊन मुलांनी आत्मसात करावे यासाठी येथील शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती उपाध्यक्षा शैला भगत […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 घोटी येथील जिल्हा परिषद शाळा मुले नं. १ ह्या केंद्रशाळेत रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत हा रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. ह्या महोत्सवाचे उद्घाटन इगतपुरी पंचायत समितीच्या शालेय पोषण आहार अधिक्षिका प्रतिभा बर्डे यांनी केले. त्यांनी दैनंदिन आहारात रानभाज्यांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ इन्स्टीट्युट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर व हॉस्पिटलमध्ये ( एसएमबीटी डेंटल हॉस्पिटल ) सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक पद्धतीने दंतोपचार केले जात आहेत. त्यामुळे संवेदनशील आणि वेदनादायक समजल्या जाणाऱ्या दंतउपचारांची भीती आता बाळगण्याची गरज राहिली नाही. दंतउपचार सुरवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालत आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण या आजारांकडे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. […]
इगतपुरी तालुक्यात लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेले मातोश्री हॉस्पिटल भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुका म्हणजे दुर्गम आणि आदिवासी तालुका.. ह्या तालुक्याच्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा हव्या असतील तर थेट नाशिक गाठावे लागते. त्यामुळे आटोग्याची चिंता असणाऱ्या लोकांना आता चिंतामुक्त होण्याची संधी आहे. अनेक नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या घोटी येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये नाशिक मुंबईमध्ये […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इगतपुरी तालुक्यातील भावली ग्रामपंचायत अंतर्गत धारवाडी, जामुंडे येथे प्रल्हाद ओमकारवती फाउंडेशन मुंबई यांचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. ह्या शिबिराचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घेतला. मोरया क्रिकेट क्लब गणेश मंडळाच्या आमंत्रणाने आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, बबन आगिवले यांच्या समन्वयाने हे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध महिला आणि पुरुषांची आरोग्य […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी धामडकीवाडी येथे प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विविध आजारावर निशुल्क चिकित्सा शिबीर आणि वैद्यकीय उपचार करण्यासाठी फाउंडेशनच्या आरोग्य पथकाने परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. राजेश देसाई, संस्थापक सदस्य शशिकांत नंदनवार यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता पंधरवडा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ नाशिक जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेच्या ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे चेअरमन फैय्याज खान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे निमित्ताने निवृत्त आरोग्य कर्मचारी सन्मान सोहळा व सभासद पाल्य गुणगौरव सोहळा नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व […]