व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी इगतपुरीत मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे उदघाटन : व्यसनी व्यक्तींवर होणार सर्वांगीण उपचार

इगतपुरीनामा न्यूज – कै. अण्णासाहेब नारायण पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित मनशांती व्यसनमुक्ती केंद्राचे इगतपुरी येथे उत्साहात उदघाटन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा सुनील रोकडे, प्रदेश उपाध्यक्ष मुन्ना गुप्ता, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले, रेस्क्यू आऊटरिच सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर सूर्यवंशी, अध्यक्ष सुनंदा सूर्यवंशी, मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, कै. अण्णासो नारायण पाटील बहुउद्देशीय संस्थेचे संचालक हुकुमचंद पाटील, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, आदर्श सोशल ग्रुप संस्थापक अजित पारख, आपले सरकार दवाखाना प्रमुख डॉ. स्नेहल म्हस्के, पत्रकार पोपट गवांदे, शैलेश पुरोहित, माजी सभापती रघुनाथ तोकडे, संदीप डावखर, आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, माजी सरपंच बाळू बोंडे, जेनेसिस फाऊंडेशनचे संचालक बिजू वर्गीस, ज्येष्ठ नागरिक संघाचे परदेशी बाबूजी, रामानंद बर्वे, युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. विजय पाटील, घाटनदेवी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नवल सोनार, मारुती गोइकणे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक हुकुमचंद पाटील यांनी व्यसनाधीनतेमुळे सर्वांचे मोठे नुकसान होते. म्हणून शासन पातळीवर प्रयत्न करून जिल्ह्यातील एकमेव केंद्र शासन मान्यताप्राप्त जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले आहे. वैद्यकीय उपचार, समुपदेशन, योगा, ध्यानधारणा आदी प्रकारे व्यसनी नागरिकांवर उपचार केले जाणार असल्याचे सांगत याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.

मधुकर सूर्यवंशी यांनी सर्वत्र व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठे असून या केंद्राचा फायदा सामान्य जनतेला होईल अशी आशा व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे यांनी सेवा बजावतांना व्यसनामुळे मनुष्य गुन्हेगारीकडे वळत असतो याची अनेक उदाहरण डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे व्यसनाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांची गरज असल्याचे सांगितले. सुनील रोकडे यांनी विपश्यना विद्यापीठामुळे इगतपुरीचे नाव जगभरात गेले आहे. त्याच धर्तीवर मनशांती व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून इगतपुरीचे नाव कानाकोपऱ्यात जाईल असा आशा व्यक्त केली. निलेश पाटील यांनी संस्थेचे संचालक माझ्या तालुक्यातले असून संस्थेमुळे माझ्या गावाचे नाव रोशन होण्यास मदत होईल असे सांगितले. मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी सर्व सोयी सुविधायुक्त तसेच व्यसनामुळे होणारे नुकसान, कुटुंबाची होणारी बरबादी याचे लावलेले चित्रमय तक्ते यामुळे समुपदेशन होईल. त्यामुळे मनशांती व्यसनमुक्ती केंद्र व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. सर्वच घटकांनी या केंद्राच्या संचालकांना व संस्थेला मदत करावी असे आवाहन केले. उपस्थितांनी मनशांती व्यसनमुक्ती केंद्राची पाहणी करत कौतुक केले. संस्थेचे संचालक वर्ग कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक भदाणे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!