डॉ. देविदास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त भगवती हॉस्पिटल आणि AS पॅथॉलॉजी लॅबतर्फे विविध सामाजिक उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील भगवती हॉस्पिटलच्या संचालकपदाच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे नामांकित डॉक्टर देविदास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम संपन्न झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तातील साखर तपासणी व  रक्तगट चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १०२ लोकांच्या रक्तगट तपासण्या झाल्या. यावेळी ४४ जणांच्या साखर तपासण्या करण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जागृती आणि विविध तपासण्या करण्यात आल्या. शिबीराच्या कार्यक्रमाचे आयोजन AS क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब आणि भगवती हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाला अशर शेख, सकलेन शेख, फैजल खान, धनराज चव्हाण आणि पंचक्रोशीतील विविध मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. डी. बी. जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

error: Content is protected !!