स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत वाडीवऱ्हे येथे इगतपुरी गटास्तरीय स्वच्छता रन उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत वाडीवऱ्हे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद नाशिक पाणी व स्वच्छता विभाग, पंचायत समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता रन, महिला रॅली व लेझीम पथक रॅली काढण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे उदघाटन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन हिरामण खोसकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) दिपक पाटील यांनी केले. वाडीवऱ्हे प्राथमिक शाळेतुन रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मारुती मंदिरापर्यंत शाळेतील लेझीम पथकासह नेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमांतर्गत पालखीद्वारे अमृत कलश गावात मिरवण्यात आला. ग्रामस्थांनी ह्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मारुती मंदिरात आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व ) दिपक पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी स्वच्छता रनमध्ये ग्रामस्थांसोबत सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. ग्रामपंचायत वाडिवऱ्हे येथील सफाई मित्रांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी हॅण्डवॉश लिक्विड देत सत्कार आणि त्यांच्या कार्याबद्धल सन्मान करण्यात आला. पाच टक्के दिव्यांग निधी धनादेशाचे वाटप यावेळी झाले. सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सरपंच रोहिदास कातोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील किशोर शिरसाळे,  सचिन गवळी, राजेश मोरे व विशाल हांडोर, तालुका कक्षातील राहुल नाईक व श्रीमती बगाड, पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!