
इगतपुरीनामा न्यूज – रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी व रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. टच वूड फाउंडेशन यांनी ह्या आरोग्य शिबीरासाठी विशेष सहकार्य केले. इगतपुरी तालुक्यातील पिंप्रीसदो भगतवाडी येथील ब्लीस हॉटेल येथे नांदगावसदो परिसराच्या २० गावातील सर्व ग्रामस्थांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सकाळी ९ वाजेपासून शिबिराला सुरवात करण्यात झाली. दिवसभरात ५०० पेक्षा लोकांनी शिबिराचा फायदा घेतला. टच वूड फाउंडेशनचे कपिल सुराणा यांनी रोटरी क्लबचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर यांचे स्वागत केले. आरोग्य तपासणीसाठी नऊ विभाग करून प्रत्येक विभागात ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉ. प्रणिता गुजराथी, डॉ. प्रतिभा बोरसे, डॉ. मेघना नाठे, डॉ. मीनल पलोड, डॉ. अश्विनी कांकरिया, डॉ. स्वप्नील विधाते, डॉ. वैभव वाणी, डॉ. संगीता लोढा, डॉ. विलास नाठे, डॉ. सोनाली काळे, डॉ. दीपा लोढा, डॉ. चैतन्य लोढा, डॉ. सुनिल बाफना, डॉ. पंकज भट यांनी तपासणी केली. यावेळी रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. शिबीराच्या यशस्वीतेसाठी टच वूड फाउंडेशनचे कपिल सुराणा व टीम, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रमोद परदेशी यांनी प्रयत्न केले. रोहित सागोरे, सोनाली नेरकर, किरण सागोरे, रुपाली सुराणा, डॉ. अवेश पलोड, रुपेश, हुकूमचंद, हर्षदा राजपूत, हेमंत पमणानी, चारुदत्ता, पुरुषोत्तम पटेल, विक्रम जगताप, उपसरपंच योगेश आगिवले, बबलू उबाळे सायजाबाई उबाळे, सचिन म्हसणे आदी उपस्थित होते.