इगतपुरीनामा न्यूज –
परमपूज्य आनंदमूर्ति गुरुमाँ भक्तपरिवार आयोजित नाशिक येथे १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका येथे योगनिद्रा सत्र होणार आहे. मानसिक तणाव हा सगळ्यांनाच असून अनेक लोक तणावात जीवन जगत आहेत. याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. मनुष्य बऱ्याच वेळा तो तणावात नाही असे समजत असला तरी तो तणावात असतो. त्याचे दुष्परिणाम शरीरावर येतातच येतात. बीपी असणे, स्थूलपणा असणे, चिडचिडे पण असणे, अति चंचल असणे असे बरेच लक्षण तणावाचे आहेत. योगनिद्रेमुळे ताणतणाव, अनिद्रा, मधुमेह, स्थूलपणा, उच्च रक्तदाब, मानसिक रोगावर विनाऔषधी फायदा होतो. आनंदी जीवन जगण्यासाठी तणावापासुन मुक्ती हाच एकमेव उपाय आहे. यावर अगदी रामबाण उपाय म्हणजे योगनिद्रा. अचेतन मनांपर्यंत पोहचण्याचे एकमेव साधन म्हणजे योगनिद्रेचा अभ्यास आहे. अन्य कोणत्याही उपायाने अचेतन मनापर्यंत पोहचता येत नाही व जोपर्यंत अचेतन मनातून तणावाचे कारण निघून जात नाही तोपर्यंत तणाव कायम राहील.योगनिद्रा एक कल्पवृक्ष असून याचे अगणित फायदे आहेत. तणावापासुन मुक्ती हा योगनिद्रेचा सुरूवातीचा फायदा आहे. खरे तर योगनिद्रा ही एक ध्यान साधना सुद्धा आहे. ही साधना शवासनामध्ये करावयाची असल्यामुळे यात कोणतीही अडचण नसते. ह्या योगनिद्रेची अनुभूती घेण्यासाठी १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका नाशिक येथे विशेष सत्र होणार आहे. प्रवेश निःशुल्क असून यामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी मात्र आवश्यक आहे. यासाठी 9372009122 यावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.