इगतपुरीनामा न्यूज – अतिदुर्गम भागात वन खात्याच्या सेवेत उच्चतम कामगिरी, वन्यप्राणी व बिबट्याशी कायम झुंजत असूनही सामाजिक कार्याचा वसा जपणारे स्व. गोरक्ष रामदास जाधव यांचे कार्य सर्वांसाठी दिपस्तंभ आहे. वाढदिवसासह कायमच गोरगरीब नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात ते कायम सक्रिय असत. कोरोनाच्या काळात लोकांसाठी काम करतांना बाधित होऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या जयंतीच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात आदिवासी माता बहिणींना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. तारांगणपाडा, बिटूर्ली, कोरपगाव, गांगडवाडी, देवाचीवाडी, पिंपळगाव भटाटा, झापवस्ती, शिंदेवाडी, कावनई, खंबाळेवाडी, धार्णोली येथील ७०० कुटुंबाना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट व खजुर पॅकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आदी घटकर्णा […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असणारे गुणवंत शिक्षक हेरून पेहचान प्रगती फाउंडेशन शिक्षणाची चळवळ समृद्ध करीत आहे. अतिदुर्गम भागात शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनंत अडचणी असतांनाही आमचे शिक्षक गुणवत्तापूर्ण काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्याने महत्व देऊन काम करणारे पेहेचान प्रगती फाउंडेशन शिक्षकांच्या पंखात तीन वर्षांपासून भरत असलेले बळ कौतुकास्पद […]
चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – दिपावली म्हणजे चैतन्याचा जागर… प्रकाशाचा उत्साह वातावरणात पसरण्याचा हा उत्सव…अंधारावर विजय मिळविण्याच्या या काळात एक वृद्ध महिला अंधारात राहत असल्याबाबत समजताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने त्या वृद्धेचे वीजबिलाची रक्कम भरून त्या वृद्ध महिलेचे घर प्रकाशमय केले. लासलगाव महावितरणचे शहर कक्ष सहायक अभियंता अजय साळवे यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक परिसरात […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील नाभिक समाजात असणाऱ्या प्रतिभावान नागरिकांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सोमवारी सन्मान करण्यात येणार आहे. नाभिक समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी अहोरात्र कष्ट घेऊन समाजातील जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४२ नाभिक बंधू भगिनींचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सोमवारी २१ ऑक्टोबरला दुपारी ३ […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील धामडकीवाडी येथे ॲडव्हेंचर एज्युकेशनल टूर दहिसर यांच्या समन्वयाने ऐरोली नवी मुंबई येथील वेबग्योर स्कुलच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. वाडीतील महिलांनी आदिवासी परंपरेनुसार लोकगीताद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती व वाडीच्या लोकजीवनाची […]
इगतपुरीनामा न्यूज – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका वंदना एकनाथ सोनार पोतदार यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच नाशिक प्रदान करण्यात आला. नाशिक ग्रामीण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजाराम […]
इगतपुरीनामा न्यूज – सर्वच सैनिक भारत देशाचे रक्षण करण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडतात. जबाबदारीमुळे त्यांना भावा बहिणींचा रक्षाबंधन हा पवित्र सण सैनिकांना साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र सैनिकांना रक्षाबंधनाच्या सणाचा आनंद घेता येत नाही. सणाच्या दिवशी त्याला त्याची बहीण आणि कुटुंबाची खूप आठवण येते. हे […]
इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मोडाळे येथील आठवी ते दहावीच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार ड्रेसचे वाटप करण्यात आले. ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सायली दीपक पालखेडकर उपस्थित होत्या. रोटरी क्लब हिलसिटीच्या कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. ह्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथील भारत दादा गांगुर्डे यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते. ह्या घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम, किराणा साहित्य, कपडे खाक होऊन हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांना ह्या घटनेची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छप्पर गमावलेल्या […]