पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ, खेळ साहित्य वाटप व वृक्षारोपण उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.  प्रगती अजमेरा यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. धामडकी, भगतवाडी, बोर्ली व कामडवाडी या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रगती अजमेरा यांच्या हस्ते वडापाव व खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या उपक्रमातून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा उत्तम प्रत्यय आला. यासह इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ यांच्या सहकार्याने विकसित झालेल्या वाघ्याचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळ साहित्य व खाऊचे वाटप प्रगती अजमेरा यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण उपक्रम भगतवाडी जिल्हा परिषद शाळेत पार पडला. वृक्षारोपणाचा शुभारंभ प्रगती अजमेरा यांचे नातवंड नवया अजमेरा व अन्नश अजमेरा यांनी त्यांच्या मित्रपरिवारासह केला. या उपक्रमात रेणी रात्रेजा, धियान शाह, आरव घाणेकर, हर्षवर्धन जाधव, स्वरित जोशी, गौरव बचानी, गर्व बचानी आणि विवान गर्ग यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, समाजसेवा आणि सहकार्याची भावना जागृत झाली. गावकरी व शिक्षकांनी पेहेचान प्रगती फाउंडेशनचे आभार मानले आणि अशा उपक्रमांची परंपरा पुढे चालू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद परदेशी यांनी फाउंडेशनतर्फे उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाला प्रकाश ठाकरे, सौरभ अहिरराव, वैशाली चौरे, सविता दातीर, पंढरीनाथ दळवी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!