इगतपुरीच्या ग्रामीण आदिवासी भागात ऊबदार ब्लॅंकेटचे वाटप : आदी घटकर्णा ट्रस्ट मुंबई, श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचा उपक्रम 

इगतपुरीनामा न्यूज – आदी घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील आदिवासी माता बहिणींना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. तारांगणपाडा, माणिकखांब, खडकवाडी, खंबाळेवाडी, वाकी, वाळविहीर, इगतपुरी गावठा येथील ५०० कुटुंबाना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट व खजुर पॅकेटचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम खंबाळे ता. इगतपुरी येथे संपन्न झाला. याप्रसंगी आदी घटकर्णा ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मनोज शहा, मुकुंदभाई गंगर, उदयभाई शहा, नितीन भाई कोठारी, हेमंत सुराणा, अण्णा पवार, संदीप बकरे, दत्ताजी शिंदे, सागर बापट, श्री जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, आदिवासी नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष नीता वारघडे, सोनी दोरे, जया भगत, शालेय पोषण आहार संघटनेचे सचिव संतोष भगत, जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य गजानन गोफणे, अजय पुरोहित, मुकुंद बोरकर, सुधीर कांबळे, जालिंदर मानवडे, बबन कदम, दामु माळी, भास्कर भगत, काशिनाथ गावित आदी उपस्थित होते. गेल्या ६ वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात हिवाळ्यामध्ये उबदार कपडे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येते, अशी माहिती श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी दिली.

error: Content is protected !!