वाडीवऱ्हे माध्यमिक विद्यालयातील २००१ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – बालपणापासून एकमेकांच्या सोबतीने शाळेचे धडे गिरवणारे मित्र म्हणजे संपूर्ण आयुष्यातली खरी कमाई…! चांगल्या वाईट सवयी, अभ्यासाचा छंद, विविध स्पर्धा, खोड्या, मस्ती, कौतुक आणि धक्काबुक्की यांचे विविध प्रसंग नेहमीच दृष्टिपटलावर तरळत असतात. मजेशीर आणि खोडकर जिंदगी म्हणजे विद्यार्थीदशा..! जेवणाचा डबा एकत्र खाण्यातली मजा… सहलीत केलेली धमाल.. शिक्षकांचे खाल्लेले धपाटे असे अनेकानेक दुर्मिळ क्षण […]

देशाच्या भवितव्यासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रेरणास्रोत ठरतील – आमदार सत्यजित तांबे : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना नाशिक जिल्हा आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवराय ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांचे विचार क्रांतीदायक आहेत. समाजाच्या विकासासाठी ह्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा विस्तार करून शिक्षकांनी सुजाण आणि सजग पिढीचे निर्माण करावे. यामध्ये सुजलाम सुफलाम होणाऱ्या भारत देशाचे भविष्य लपलेले आहे. हे भवितव्य घडवण्यासाठी गुणवंत शिक्षकांना दिले जाणारे जिल्हास्तरीय पुरस्कार प्रेरणास्रोत ठरतील. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती […]

“आयसीएमएआय” नाशिक चॅप्टरतर्फे फाउंडेशन, एंटरमेडीएट व फायनल परीक्षा संपन्न : २०२५ शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु – अध्यक्ष अमित जाधव

इगतपुरीनामा न्यूज – कोलकाता येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटस ऑफ इंडिया ( ICMAI ) तर्फे भारतभर घेतल्या जाणाऱ्या फाउंडेशन, इंटरमीडीएट व फायनल डिसेंबर २०२४ च्या परीक्षा संपन्न झाल्या. कॉस्ट अकाउंटेंट्स या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परिक्षांचे आयोजन हे केंद्र सरकारच्या “दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICMAI) संस्थेच्या वतीने केले जाते. १२ […]

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन : ५ जानेवारीला नाशिकला होणार भव्य सोहळा

इगतपुरीनामा न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी ५ जानेवारी २०२५ ला सकाळी १० वाजता रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजवळ, गंगापुर रोड नाशिक येथे हा सोहळा होणार आहे. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांचे “समाज जीवन व शिक्षकांची […]

सामाजिक कार्याचा वसा जपणारे स्व. गोरक्ष रामदास जाधव यांचे कार्य सर्वांसाठी दिपस्तंभ : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोलापुरी चादरी वाटप उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – अतिदुर्गम भागात वन खात्याच्या सेवेत उच्चतम कामगिरी, वन्यप्राणी व बिबट्याशी कायम झुंजत असूनही सामाजिक कार्याचा वसा जपणारे स्व. गोरक्ष रामदास जाधव यांचे कार्य सर्वांसाठी दिपस्तंभ आहे. वाढदिवसासह कायमच गोरगरीब नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात ते कायम सक्रिय असत. कोरोनाच्या काळात लोकांसाठी काम करतांना बाधित होऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या जयंतीच्या […]

शिक्षण कट्ट्यावर राज्य अभ्यासक्रम आराखडा अपेक्षा आणि वास्तवाचे सखोल विचारमंथन

इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्यावतीने राज्य अभ्यासक्रम आराखडा -२०२४’ या विषयावर शनिवार, दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी शिक्षण कट्टा आयोजित केला होता. या कट्ट्याची सुरूवात योगेश कुदळे यांनी केलेल्या स्वागताने झाली. स्वागत करतेवेळी या कट्ट्याच्या आयोजनामागचा भूमिका त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डाॅ. माधव सूर्यवंशी यांनी […]

पॉवर लिफ्टिंग अणि शरीर सौष्ठव स्पर्धेत नाशिप्रच्या इगतपुरी महाविद्यालयाचे यश

इगतपुरीनामा न्यूज – सिन्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात नुकत्याच आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. ह्या स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने यश मिळवले. द्वितीय वर्ष कला वर्गातील पूजा पांडुरंग बिन्नर हिने ५३ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. नाशिकच्या केबीटी इंजिनीअरिंग महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत पंढरीनाथ […]

शिक्षणाची चळवळ समृद्ध करण्यासाठी पेहेचान प्रगती फाउंडेशनकडून अभिमानास्पद कामगिरी – शिक्षण उपसंचालक डॉ. योगेश सोनवणे : पेहेचान प्रगती फाउंडेशनचा प्रगती सन्मान पुरस्कार सोहळा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असणारे गुणवंत शिक्षक हेरून पेहचान प्रगती फाउंडेशन शिक्षणाची चळवळ समृद्ध करीत आहे. अतिदुर्गम भागात शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनंत अडचणी असतांनाही आमचे शिक्षक गुणवत्तापूर्ण काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्याने महत्व देऊन काम करणारे पेहेचान प्रगती फाउंडेशन शिक्षकांच्या पंखात तीन वर्षांपासून भरत असलेले बळ कौतुकास्पद […]

टिटोली शाळेत संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत संविधान दिनानिमित्त, घर घर संविधान उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संविधान दिनाचे महत्व सांगत शाळेतील विद्यार्थ्यांनी यानिमित्त आयोजन करीत विद्यार्थ्यानीच सुत्रसंचलनापासुन तर आभार प्रदर्शन व्यक्त करण्यात भुमिका पार पाडली. आपली मुलभुत हक्क आणि कर्तव्य, लोकशाही म्हणजे काय?, संविधान दिन का साजरा करण्यात केला जातो […]

जिल्हा परिषदेच्या विनोबा स्टार टिचर जिल्हास्तरीय पुरस्काराने वंदना सोनार सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज – दरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षिका वंदना सोनार यांना महाराष्ट्र शासनाच्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय शैक्षणिक योगदानासाठी विनोबा स्टार टिचर जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल  यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. नुकताच अतिदुर्गम आदिवासीबहुल भागातील दरेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी वंदना […]

error: Content is protected !!