
इगतपुरीनामा न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सुरु आहे. त्या अनुषंगाने गिरणारे जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक मॉडेल शाळेत राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्था व स्वामी विवेकानंद बहुउदेशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण कलागुणांना वाव मिळावा त्यांना आत्म अभिव्यक्तीची संधी मिळावी, देशाबद्धल कर्तव्याची जाणीव व्हावी, उद्याचा समर्थ नागरिक घडावा या हेतूने ह्या स्पर्धा आयोजित केल्याचे मासाहेब जिजाऊ साहेब संस्थेच्या अध्यक्षा वैशाली विजय आडके यांनी सांगितले. निबंध, चित्रकला स्पर्धेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष सुरेश संधान, चारोळ्या ठाकूर, सौ. परांडे, माजी नगरसेवक संपत डावकर, शालेय समितीचे अध्यक्ष ॲड. सुनील लहाने मुख्याध्यापक शामराव गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेमध्ये १७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिली ते दुसरी, तिसरी चौथी आणि पाचवी ते सातवी या तिन्ही गटात निंबध व चित्रकला स्पर्धा घेण्यातआल्या. सर्व स्पर्धकाना प्रशस्तीपत्रक व विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. गिरणारे ग्रामस्थांनी कार्यक्रमाला सहकार्य केले.