
इगतपुरीनामा न्यूज : राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्ताने इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. इगतपुरी येथील महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती संघ संचलित संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी सोनाक्षी कैलास जाधव हिने यामध्ये वक्तृत्वस्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ काल दिंडोरी येथील खुशीराज प्राथमिक आश्रमशाळेत आयोजित करण्यात आला होता. इमाव आणि बहुजन कल्याण विभागाचे मंत्रालय कक्ष अधिकारी कमलेश पवार आणि नाशिक जिल्हा सहाय्यक संचालक संतोष चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह सोनाक्षी हिचा गौरव करण्यात आला. सोनाक्षीच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रमिला गोस्वामी, मुख्याध्यापक मनोज गोसावी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सोनाक्षीचे अभिनंदन केले आहे.