
इगतपुरीनामा न्यूज – गरजूंसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱ्या खैर उम्माह चॅरिटेबल सोसायटी, इगतपुरी यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत एक स्तुत्य उपक्रम राबविला. इगतपुरी येथील इंदिरा गांधी कर्णबधिर विद्यालयातील १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दैनंदिन जीवनात उपयोगी वस्तू आणि अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, यांसह साबण, तेल, टूथपेस्ट, फिनाईल अशा वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तूंचा समावेश असलेली किट्स वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी तांदूळ, तेल, गहू अशा आवश्यक अन्नधान्याचे पॅकेट्सही देण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, देवयानी गायकवाड, अभिजीत पोटिंदे, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, डॉ. हारून रशीद कादरी, नाशिक, ॲड. शबाना मेमन, डॉ. अशपाक शेख, सोसायटीचे अध्यक्ष इम्रान खान, सेक्रेटरी इमरान शेख, तौसिफ सय्यद, अविनाश कासार, जावेद सिद्दिकी, खजिनदार मुजफ्फर सय्यद, नदीम खान, अय्याज खान, सामाजिक कार्यकर्ते इफ्तेकार शेख, पत्रकार सुमित बोधक, शैलेश पुरोहित, पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. मुख्याध्यापक हेमलता जाधव यांनी उपक्रमाचे स्वागत करून खैर उम्माह चॅरिटेबल सोसायटीचे आभार मानले. या उपक्रमाच्या निमित्ताने गरजू व विशेष विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श खैर उम्माह चॅरिटेबल सोसायटीने पुन्हा एकदा उभा केला आहे. समाजातील अशा संस्था गरजूंना आधार देत असताना समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून, इतरांनीही अशा उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, असे मत यावेळी एनबीटी लॉ कॉलेजचे मुख्याध्यापक हारून रशीद कादरी यांनी व्यक्त केले.