
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील दिलेल्या भाषणाची स्पर्धा घेण्यात आली. यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेत दिलेल्या ऐतिहासिक भाषणाने आपल्या देशाची वेगळी ओळख जगाला झाली. त्या भाषणाची पाठांतर स्पर्धा घेऊन त्यातले अमूल्य विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे हा आमच्या संस्थेचा मानस असून त्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेप्रसंगी अनिस शेख हे परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्रा. एल. एस. अहिरे यांनी केले. प्रभारी प्राचार्या प्रतिभा हिरे यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंदाच्या कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व राजयोग याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. एल. सोनवणे यांनी तर आभार प्रा. एम. डी. भालेराव यांनी केले.