डॉ. शरद तळपाडे – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे व्हिजन असणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही आदिवासीबहुल तालुके मिळून विधानसभा मतदारसंघ आहे. सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर दोन्हीही तालुक्यातील अनेक मूलभूत समस्या सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत. ह्या मतदारसंघातील स्थानिक कुशल तरुणांना हक्काचा रोजगार नाही, आदिवासी वाड्या वस्त्यासह विविध गावांतील खड्डेमय रस्ते वर्षानुवर्षे जैसे थे आहे. दुर्दैवाने ह्या दोन्हीही तालुक्याची ओळख समस्यांचे […]

इगतपुरीनामा इफेक्ट – घोटी स्टेट बँक आवारातील मुक्कामी आणि अन्य सर्व महिलांना मिळाला न्याय : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांचा उद्या बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – “केवायसी साठी आदिवासी लाडक्या बहिणी घोटी स्टेट बँकेच्या आवारात उघड्यावर मुक्कामी : ५ दिवसांपासून काम होत नसल्याने मुक्कामाचा निर्णय” ही बातमी “इगतपुरीनामा”ने आज पहाटे प्रकाशित केली होती. ही बातमी वाचून इगतपुरी तालुक्यात स्टेट बँकेच्या कारभारावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. बातमीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांना चहा आणि बिस्किटे वाटप […]

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण ; नाशिकमध्ये उपचार सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, अंगदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांचे चिरंजीव वामन खोसकर ह्यांच्यावर सध्या डेंग्यूचे उपचार सुरु आहेत. म्हणून आपल्याला डेंग्यू असल्याचा संशय आल्याने आमदार खोसकर यांनी वैद्यकीय उपचार घेतले. यासाठी हॉस्पिटलने केलेल्या कोरोना तपासणीनुसार त्यांना […]

केवायसी साठी लाडक्या बहिणींचा घोटी स्टेट बँक आवारात उघड्यावर मुक्काम : ५ दिवसांपासून काम होत नसल्याने मुक्कामाचा निर्णय

इगतपुरीनामा न्यूज – लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वस्त केले होते. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आदिवासी […]

घोटी बाजार समितीच्या उपसभापतीपदी संपत वाजे बिनविरोध विराजमान

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी संपत किसन वाजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे सर्व स्तरात स्वागत होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात उपसभापती निवडीसाठी संचालकांची सभा आज पार पडली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा निवडणूक अधिकारी म्हणून अर्चना सैंदाणे यांनी […]

नांदगाव सदो माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना बांधल्या राख्या :  रक्षाबंधनाचा सण सैनिकांसोबत केला साजरा

  इगतपुरीनामा न्यूज – सर्वच सैनिक भारत देशाचे रक्षण करण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडतात. जबाबदारीमुळे त्यांना भावा बहिणींचा रक्षाबंधन हा पवित्र सण सैनिकांना साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र सैनिकांना रक्षाबंधनाच्या  सणाचा आनंद घेता येत नाही. सणाच्या दिवशी त्याला त्याची बहीण आणि कुटुंबाची खूप आठवण येते. हे […]

वाहतुकीचा खेळखंडोबा – पिंपळगाव टोल प्रशासन, महामार्ग विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि ठेकेदाराच्या ४२ पिढ्यांचा होतोय उद्धार : जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला उद्या शिवसैनिक काळे फासणार – शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे यांचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकपासून वाडीवऱ्हे गोंदे पर्यंत वाहतुक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दोन ते चार तास लागत आहेत. लहान मोठी वाहने, मोटारसायकली चांगलीच अडकून बसत असल्याने वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन केलेले नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. याच कारणांनी अपघातही […]

५ ठार, ४ गंभीर जखमी ; ३०० फूट दरीत टँकर कोसळून अपघात : कसारा घाटात झाली घटना ; मदतकार्य सुरु

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक मुंबई महामर्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंट जवळ दूध टँकरला अपघात झाला आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर तीनशे फूट दरीत कोसळला आहे. ह्या घटनेत ५ जण ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि महामार्ग पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन […]

वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावरील अपघातात १ ठार, २ जण जखमी : नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे सांजेगाव रस्त्यावर आज दुपारी अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. आज दुपारी १ वाजेच्या सुमाराला झालेल्या ह्या घटनेत १ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय […]

टिटोली येथे उभारले आकर्षक भारतमाता सार्वजनिक सभामंडप : विविध उपक्रमांनी ७८ वा स्वातंत्र्यदिन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या स्वातंत्र्यदिन सुवर्णमुहूर्ताचे औचित्य साधून इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायतीतर्फे ग्रामनिधीतील ५ टक्के रक्कम गावातील दिव्यांग बांधवांना वाटप केली. २४ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ हजार १५१ रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. विजेते वेगळी गोष्ट करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात ह्या विचारधारेप्रमाणे माजि सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल भोपे यांची […]

error: Content is protected !!