दुखणे ग्रामीण आरोग्य सेवेचे – वैतरणा आरोग्य केंद्रातील मृत आरोग्य व्यवस्थेची उद्या काढणार प्रेतयात्रा : एल्गार कष्टकरी संघटना करणार अनोखे निषेध आंदोलन

इगतपुरीनामा न्यूज – वैतरणा नगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बेजबाबदार कामकाजाबाबत इगतपुरीच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी, तोंडी, फोन द्वारे तक्रारी केल्या. मात्र अद्याप पर्यंत ह्या आरोग्य केंद्रातील कामकाजात काहीही सुधारणा झालेली नाही. एकही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. रुग्णांवर सफाई कर्मचारी व नर्स उपचार करत असतात. दोन दिवसापूर्वी सातूर्ली फाट्यावरील अपघातात दहा प्रवासी […]

गोंदे दुमाला येथील १९७० ओल्ड प्रभू ढाबा दुसऱ्या शाखेचा गुरुवारी २९ ऑगस्टला भव्य शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला महामार्गावरील नामांकित १९७० ओल्ड प्रभू ढाब्याच्या दुसऱ्या शाखेचा गुरुवारी २९ ऑगस्टला भव्य शुभारंभ होत आहे. महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जुन्या हॉटेल समोर, गोंदे येथे हा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ढाब्याचे संचालक चाटे परिवाराने केले आहे. या नवीन हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी एसी, नॉन एसी लॉजिंग बोर्डिंग […]

कामांचा तणाव दूर सारून शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी नासिक इंजिनिअर्स जिमखान्यातर्फे दावलेश्वर येथे वर्षा सहल : जिल्ह्यातील अनेक अभियंत्यांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद 

इगतपुरीनामा न्यूज – अभियंता म्हटले की अचूकता, दर्जा व वेळेचे बंधन आणि कमतरता हे सर्व आलेच. ह्या सर्व गोष्टींसाठी शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य देखील तेवढेच महत्वाचे ठरते. हे ध्यानात घेऊन दैनंदिन वेळापत्रकामध्ये स्वत:सह आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य, नैसर्गिक वातावरणात फिरण्यासाठी सुद्धा वेळ राखून ठेवलाच पाहीजे. ह्याचाच एक भाग म्हणुन नासिक इंजिनिअर्स जिमखाना नाशिक यांनी दिमाखदार वर्षा […]

बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला ; हत्या झाल्याचा संशय : घोटी पोलिसांकडून ५ जण ताब्यात ; कसून तपास सुरु

इगतपुरीनामा न्यूज – बोरीची वाडी, पिंपळगाव मोर ता. इगतपुरी येथील ३२ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह वासाळी परिसरातील जंगलात आढळून आला आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याबाबत घोटी पोलिसांना खबर देण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून ह्या महिलेचा घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजेपासून तिचा मृतदेह पंचनामाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. मृतदेहाची अवस्था […]

महिलांनी उभी केलेली श्री स्वामी समर्थ सूतगिरणी राज्याला प्रेरणादायी – खासदार भाऊसाहेब वाकचौरे : डिसेंबरपासून सूतगिरणीचे उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने

इगतपुरीनामा न्यूज – दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांच्या मार्गदर्शनाने रणरागिणी महिलांनी श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती सहकारी सूतगिरणी उभी केली आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे हे दैदीप्यमान कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. २४ वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आता मोठ्या वृक्षात परिवर्तीत होऊन मधुर फळे द्यायला सज्ज झाले आहे. महिलांचे सक्षम नेतृत्व म्हणून चेअरमन डॉ. नीता […]

बेपत्ता गणपत तुपे ह्या युवकाचा शोध लावण्याचे घोटी पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळ असणाऱ्या देवळे गावातील एक युवक मंगळवारी सकाळी नाशिकला जातो असे सांगून बेपत्ता झाला आहे. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद असून त्याचा शोध लागला नसल्याने त्याच्या कुटुंबाने घोटी पोलिसांकडे शोध लावण्याबाबत खबर दिली आहे. या युवकाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास घोटी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती […]

शेअर्समध्ये जास्त फायद्याच्या नावाखाली २७ लाख ७५ हजारांना घातला गंडा : इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवून देण्याच्या नावाखाली व्हॉटसॲप आणि मोबाईल कॉलद्वारे इगतपुरी येथील एकाला आणि त्याच्या कुटुंबियांना सायबर भामट्यांनी २७ लाख ७५ हजार ६०७ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६ क/ ड आणि भारतीय दंडविधान संहिता कलम ४२०, ४०९, […]

डॉ. शरद तळपाडे – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे व्हिजन असणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही आदिवासीबहुल तालुके मिळून विधानसभा मतदारसंघ आहे. सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर दोन्हीही तालुक्यातील अनेक मूलभूत समस्या सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत. ह्या मतदारसंघातील स्थानिक कुशल तरुणांना हक्काचा रोजगार नाही, आदिवासी वाड्या वस्त्यासह विविध गावांतील खड्डेमय रस्ते वर्षानुवर्षे जैसे थे आहे. दुर्दैवाने ह्या दोन्हीही तालुक्याची ओळख समस्यांचे […]

इगतपुरीनामा इफेक्ट – घोटी स्टेट बँक आवारातील मुक्कामी आणि अन्य सर्व महिलांना मिळाला न्याय : आदिवासी नेते लकीभाऊ जाधव यांचा उद्या बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज – “केवायसी साठी आदिवासी लाडक्या बहिणी घोटी स्टेट बँकेच्या आवारात उघड्यावर मुक्कामी : ५ दिवसांपासून काम होत नसल्याने मुक्कामाचा निर्णय” ही बातमी “इगतपुरीनामा”ने आज पहाटे प्रकाशित केली होती. ही बातमी वाचून इगतपुरी तालुक्यात स्टेट बँकेच्या कारभारावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. बातमीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांना चहा आणि बिस्किटे वाटप […]

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण ; नाशिकमध्ये उपचार सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसांपूर्वी मुंबईहून आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, अंगदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांचे चिरंजीव वामन खोसकर ह्यांच्यावर सध्या डेंग्यूचे उपचार सुरु आहेत. म्हणून आपल्याला डेंग्यू असल्याचा संशय आल्याने आमदार खोसकर यांनी वैद्यकीय उपचार घेतले. यासाठी हॉस्पिटलने केलेल्या कोरोना तपासणीनुसार त्यांना […]

error: Content is protected !!