इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी इगतपुरी शहर आणि तालुक्यात आपल्या कामगिरीने पोलीस खात्याची शान वाढवली आहे. त्यांनी जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. राजू सुर्वे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकुशललेने इगतपुरी शहर परिसरातील गुन्हेगारीचा […]
इगतपुरीनामा न्यूज – मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर अवघा समाज उभा ठाकला असून ह्या आंदोलनाला वेगवेगळ्या समाजाने पाठिंबा दिलेला आहे. समाजाचा लढा निर्णायक टप्प्यावर आला असल्याने ह्या परिस्थितीत ह्या आंदोलनाला बळ देण्यासाठी स्व. गोपाळराव गुळवे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. समाजासाठी दादांनी दिलेले योगदान आणि तोच वारसा पुढे चालवण्यासाठी जिल्ह्याचे नेते मविप्रचे संचालक ॲड. […]
इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली […]
इगतपुरीनामा न्यूज : इगतपुरी शहरातील प्रथीतयश वैद्यकीय व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. काजल परदेशी यांचा वाढदिवस संजीवनी आश्रम शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. आश्रमशाळा प्रशासनाकडून यावेळी त्यांचे हृद्य सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी डॉ. परदेशी यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण आश्रमशाळेमध्ये मिळत आहे, त्याचबरोबर उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधाही […]
लेखन – प्रा. छाया लोखंडे, एसएमआरके महिला महाविद्यालय, नाशिक ज्ञानदान आणि समाजकार्य याची अनोखी सांगड घालणाऱ्या कर्तृत्ववान प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे ह्यांची गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार पदी नियुक्ती झाली आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.केवळ नाशिककरांनाच नव्हे तर सर्वसामान्य भारतीयांना अभिमान आणि आत्मीयता वाटेल अशी गोखले एज्युकेशन सोसायटीची कारकीर्द आहे. उत्तरोत्तर बहरत […]
इगतपुरीनामा न्यूज – शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी ह्यांचे ९ जुलैला वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले. शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना मास्टर टीचर मिलेनियम, भारतरत्न लता मंगेशकर ह्यांच्या हस्ते विद्या सरस्वती अवार्ड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र भूषण अवार्ड , ज्ञानहीरा, राजीव गांधी […]
इगतपुरीनामा न्यूज – कोरोनामुळे रोजगार ठप्प, खाण्यापिण्यांची भ्रांत, संचारबंदी, आजारपण आणि कोरोनाची संभाव्य लागण, औषधे, लसीचा तुटवडा, बेडच्या समस्या, ऑक्सिजन मिळेना आणि कोणी जवळचेही कोणी उभे करीना अशा अत्यंत भयानक अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील सामान्यातला सामान्य माणूस कोरोनाचा काळ सोसत होता. इगतपुरी तालुक्यातील एकच अवलिया व्यक्ती देवदूत बनून जातीधर्माच्या पलीकडे जाऊन फक्त माणसाच्या हृदयातला परमेश्वर प्रसन्न […]
लेखन – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा पवित्र ते कुळ पावन तो देशजेथे हरिचे दास जन्म घेतीअसे सर्वच संतांचे सिद्ध झालेले प्रमाण आहे. ह्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका सुद्धा मागे नाही. ह्या तालुक्यात विविध रत्नांची खाण आहे. ह्यापैकी अत्यंत महत्वाचे अनमोल असणारे एक रत्न हभप शत्रुघ्न महाराज महादु गतीर हे १ एप्रिल २०२३ ला वैकुंठवासी झाले. […]
लेखन – भास्कर सोनवणे, संपादक अन्नदानं पर दानं विद्यादानमत: परम् ।अन्नेन क्षणिका तृप्ति: यावज्जिवं च विद्यया ॥अन्नदानामुळे भुकेल्या व्यक्तीला अल्पकाळाची तृप्ती मिळते. मात्र मिळालेल्या योग्य विद्यादानामुळे प्रत्येकाला आयुष्यभराची सुख समृद्धी मिळते. याच प्रकारे आयुष्याच्या जवळपास चार दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे “गिरी”तुल्य व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. देविदास गिरी…सर्वांगीण क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास, भाषेवर जबरदस्त प्रभुत्व, कौशल्यदायी […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज “ओलें मूळ भेदी खडकाचें अंग | अभ्यासासी संग कार्यसिध्दी” ह्या अभंगाद्वारे असाध्य गोष्टी साध्य करण्यासाठी साधकांना मार्गदर्शन करतात. त्या अभंगाचा सारांश असा आहे की, दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते पण हेच विष सातत्याने थोडे थोडे […]