अनेकांना “जनसेवक” बनवणारे किमयागार आणि कृतिशील व्यक्तिमत्व निवृत्ती पाटील जाधव : सामान्य शिवसैनिक ते उपजिल्हाप्रमुख पदाद्वारे लोकप्रियता लाभलेला नेता

इगतपुरी तालुक्यातील तमाम नागरिकांसाठी ३६५ दिवस २४ तास ऊन, वादळ, पाऊस यांचा विचार न करता कटीबद्ध असणारे निवृत्ती पाटील जाधव अवघ्या नाशिक जिल्ह्याला सुपरिचित आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकांशी ऋणानुबंध निर्माण करणारे निवृत्ती पाटील जाधव शिवसेना ( उबाठा ) उपजिल्हाप्रमुख आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाहून घेत संवेदना ठेवून प्रश्नाचे उत्तर शोधण्यात त्यांचा हातखंडा आहे. अखंडितपणे अध्यात्मिक मार्गाची सांगड घालून लोकांच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे इगतपुरीच नव्हे तर थेट “मातोश्री” पर्यंत चाहते आहेत. सामाजिक भान ठेवणाऱ्या ह्या कृतिशील उमद्या आक्रमक राजकीय नेत्याचा १ मार्चला जन्मदिवस आहे. जन्मदिनाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे समर्थक नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांनी शालेय जीवनानंतर हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रगल्भ विचारांवर आणि शिवसेनेवर ठेवलेली घट्ट श्रद्धा आजही त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात वाहत आहे. परिस्थिती प्रतिकूल किंवा अनुकूल असली तरी डगमगून न जाता ध्येयासाठी लढण्याची धमक त्यांनी सर्वांना शिकवलेली आहे. अस्तित्वासाठी कष्ट करण्याची, जोडलेले कार्यकर्ते फक्त आयुष्यभर टिकवण्याची अभिजात कला त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. सुसंस्कारी आणि आदर्श असणारे निवृत्ती पाटील जाधव यांना तमाम नागरिकांकडून जन्मदिनाच्या शुभेच्छा मिळत आहेत.

इगतपुरी तालुक्यात शिवसेनेचा लावलेल्या छोट्या वृक्षाने वटवृक्ष स्वरूप धारण करण्यात आणि जिल्हाभर पसरवण्यात निवृत्ती जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे. इगतपुरी पंचायत समितीवर सतत भगवा फडकविण्याचे काम निवृत्ती भाऊंनी केले आहे. तालुक्यात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केलेले आहे. म्हणूनच त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने जनता जनार्दन आणि सर्वांचा प्रतिसाद मिळतो. आपल्या कार्यकर्त्यांमधील उपयुक्त गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम निवृत्ती जाधव नेहमीच करीत असतात. लहान मोठे, युवक, युवती, जेष्ठ नागरिक या सर्वांनी त्यांना “भाऊ” पदवी बहाल केलेली आहे. सामान्य शिवसैनिक ते शिवसेना उपजिल्हाप्रमुख हा प्रवास करताना अनेकांना आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणून घडवले. ह्या सर्वांना जनसेवक बनवणारे किमयागार म्हणून निवृत्ती पाटील जाधव एकमेवाद्वितीय आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागर्दर्शनाखाली इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाची धुरा सांभाळतांना अचूक नियोजन, व्यवस्थापन आणि अचूक व्युव्हरचना उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुकाचा थाप देणारा ठरतो. आगामी काळात निवृत्ती पाटील जाधव हे लोकप्रिय व्यक्तिमत्व राज्य पातळीवरील राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे तारणहार ठरावेत अशी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

Similar Posts

error: Content is protected !!