इगतपुरीनामा न्यूज – मुंबई क्राईम ब्रॅंचमध्ये उल्लेखनीय काम करून इगतपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून राजू सुर्वे १० मार्चपासून रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी इगतपुरी शहर आणि तालुक्यात आपल्या कामगिरीने पोलीस खात्याची शान वाढवली आहे. त्यांनी जनमानसात वेगळी प्रतिमा निर्माण करून गुन्हेगारांवर वचक निर्माण केला आहे. राजू सुर्वे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकुशललेने इगतपुरी शहर परिसरातील गुन्हेगारीचा बिमोड केला. यासह त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखून शांतता प्रस्थापित करण्यासाठी भरीव कामगिरी केली. त्यामुळे त्यांना श्री भक्तीधारा परिवाराचा मानाचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंद, निवृत्त उपायुक्त डॉ. मेनकर, भक्तीधारा आध्यात्मिक परिवाराचे संचालक हभप श्रीमंत बागल लातूरकर आदी मान्यवरांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. मागील १ वर्षापेक्षा अधिक काळ खुनाच्या गुन्ह्यात हवे असलेले गुन्हेगार जेरबंद केले. इगतपुरी शहरात दहशत निर्माण केलेल्यांचे अल्प कालावधीत अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्यामुळे सर्वच गुन्ह्यांना आळा बसला असून गुन्हेगारावर वचक निर्माण झाला आहे. इगतपुरी वासीयांमध्ये पोलिसांबद्धल चांगली भावना दृढ झाली. सर्वसामान्य जनतेमध्ये पोलिसावरील विश्वास आणि पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. इगतपुरीकर पोलिसांच्या दक्षतेवर आणि कार्यावर मनापासून समाधानी आहेत. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group