इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सदाशिव जाधव : विविधांगी विकासाचा आलेख असणारे व्यक्तिमत्व 

इगतपुरीनामा न्यूज – इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश सदाशिव जाधव हे लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. स्व. दादांच्या समृद्ध विचारांची प्रेरणा आणि विकासाचे धोरण रमेश जाधव यांनी अंगीकारलेले आहे. त्यानुसार राजकीय, सामाजिक जीवनात त्यांनी सातत्याने शेतकरी, बेरोजगार व सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्याचे काम केले आहे. संपूर्ण तालुका आणि जिल्हाभर दांडगा जनसंपर्क असलेले हे व्यक्तिमत्व आजही नव्या उमेदीने लोकांच्या सेवेचे व्रत घेऊन काम करतांना दिसते. इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी चांगले काम केले. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना ह्या प्रश्नांची जाणीव करून देत ते समूळ सोडवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले. पक्षाच्या बळकटीसाठी पायाला भिंगरी लावून त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन चांगली कामगिरी केलेली आहे. पगोंदे दुमाला येथे औद्योगिक वसाहत, बँका, संस्था आणण्यासाठी त्यांचे भरीव योगदान आहे. मविप्रचे संचालक संदीप गुळवे यांच्या खांद्याला खांदा लावत शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे असे ते नेहमी सांगतात. १ जूनला त्यांचा वाढदिवस असून त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

गोंदे दुमाला येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातुन आलेले रमेश जाधव यांनी गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीत शेकडो बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळवून दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पक्षाच्या माध्यमातून वाचा फोडून ते सोडवण्याची नेहमीच त्यांचे प्रयत्न असतात. गोंदे दुमाला येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, गोंदे, विविध कार्यकारी सोसायटीची नोंदणी व निर्मिती करण्यात त्यांचा सिहाचा वाटा आहे. गोंदे दुमाला येथे सरपंच असतांना त्यांनी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी राबवलेला फिल्टर प्लांट जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. गावातील छोटे मोठे रस्ते, काँक्रीटीकरण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आदी केलेली महत्वाची कामे उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे मुकणे धरणात जॅकवेल टाकुन ग्रामस्थांना २४ तास  मुबालक पाणीपुरवठा मिळत आहे. तत्कालीन मंत्री गोविंदराव आदिक, बाळासाहेब थोरात यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवले. त्यामुळे पाण्याअभावी चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या जमिनी ओलीतखाली येऊन चांगला फायदा झाला आहे. राजकारणात नव्याने येणाऱ्या पिढीला आणि जुन्या व्यक्तींनाही जनसेवेच्या कामांसाठी प्रेरणादायक असणाऱ्या रमेश जाधव यांना वाढदिवसानिमित भरभरून शुभेच्छा..!

Similar Posts

error: Content is protected !!