‘प्रत्येकाला मदत करणे’ हा लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांचा धर्म होता – ‘मविप्र’ सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे

इगतपुरीनामा न्यूज – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्याकडे माणसे ओळखण्याची ताकद व समाजाला हवे ते देण्याचे सामर्थ्य होते. ‘मविप्र’ संचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा जिल्हाभर उमटला. माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीतही त्यांचे मोलाचे योगदान होते असे प्रतिपादन ‘मविप्र’ सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी आमदार इगतपुरीचे हिरामण खोसकर म्हणाले की, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सिंचन, औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला. माझ्यासारखी व्यक्तीही दादांसाहेबांनी आशीर्वाद दिल्यामुळेच आज आमदार स्वरुपात दिसत आहे. यावेळी ‘मविप्र’ संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे, निवृत्ती जाधव, ज्ञानेश्वर लहाने, वैशाली आडके, रमेश जाधव, सुनील रोकडे, सुनील जाधव, जयराम धांडे, सुदाम भोर, तुकाराम सहाणे, मधुभाऊ कोकणे, सर्व प्राध्यापक व सेवक वर्ग आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांनी प्रास्ताविक केले. कार्यालयीन कर्मचारी अमोल टिळे, अनिता घारे यांनी मनोगत व्यक्त केले. विकास कोकाटे याने स्व. गोपाळराव गुळवे यांच्या रांगोळीतून साकारलेल्या प्रतिमेचे कौतुक करीत आमदार हिरामण खोसकर, प्रा.संजय फाकटकर यांनी त्याला बक्षीस देऊन गौरव केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. बी. राठोड यांनी तर आभारप् संजय फाकटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अरुण वाघ, डॉ. कल्पना वाजे, प्रा. योगेश उगले, सुनील जाधव, योगेश भोईर, चंदू खातळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Similar Posts

error: Content is protected !!