
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक येथील सुप्रसिद्ध सुलेखनकार सचिन गडाख यांना तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात ‘अक्षर गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रविवारी (दि. २६) कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्य विभागात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या हस्ते गडाख यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू दिगंबर शिर्के, मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कहलास बिलोणीकर. राज्याच्या महसूल व वनविभागाचे सहसचिव संजय इंगळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. डी. शिंदे आदी प्रमुख पाहुण्यांसह अक्षर संमेलनाचे आयोजक अमित भोरकडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात कोल्हापूर येथील ज्येष्ठ चित्रकार सुरेश पोतदार यांच्यासह बबन माने व मुंबई येथील भागवत सपकाळे यांनी निसर्गचित्रांची प्रात्यक्षिके तसेच रांगोळी कलाकार मिताली सुर्वे मुंबई व कायमस्वरूपी रांगोळी शीतल गंधक, वाशीम व स्केच आर्टिस्ट अतुल गायकवाड यांनी लाईव्ह स्केच दाखवून प्रत्यक्षिके सादर केली. या पुरस्काराबद्दल गडाख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.