इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या धामणी ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या रंजना लाड यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने सरला नारायण भोसले ह्यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, गौतम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच बन्सी यांनी काम पाहिले. ग्रामसेवक सुभाष ठाकरे यांनी त्यांना सहाय्य केले. उपसरपंच पदासाठी रंजना लाड ह्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. मावळत्या उपसरपंच सरला भोसले, ग्रामपंचायत सदस्य गौतम भोसले, महेंद्र पगारे, रोहिणी घोटे, सुरेश गांगड, बाळू जाधव, मंदा उघडे, रंजना आगिवले हजर होते. स्वराज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, सोपान भोसले, गोपाळा भोसले, बाळू भोसले, शिवाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भोसले, बहिरू भोसले, राजू भोसले, सागर भोसले आदींनी निवडीचे स्वागत केले. भाऊसाहेब गायकवाड, विनायक लाड, मनोज लाड, राहुल लाड, जालिंदर लाड, शिवनाथ लाड, ज्ञानेश्वर शिवाजी भोसले, ज्ञानेश्वर बहिरू भोसले, परसराम भोसले, दिलीप घोटे यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group