इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – नाशिक जिल्ह्यातील मोठी आर्थिक उलाढाल आणि राजकीय क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहेत. ह्या निवडणुकीसाठी इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. रमेश जाधव यांनी सोसायटी गटातील आरक्षित जागेवर हा अर्ज दाखल केला. याप्रसंगी जेष्ठ नेते रामदास बाबा मालुंजकर, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष सुदाम भोर, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन जयराम धांडे, संपतराव धोंगडे, दिलीप जाधव, संजय नाठे, गोंदे दुमालाचे माजी चेअरमन विजय नाठे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे, शांताराम जाधव, संजय अमृता नाठे, भास्कर कातोरे, संपत वाजे, कारभारी दादा नाठे, विजय कचरू नाठे, एकनाथ भोर, त्र्यंबक भोर, पंढरी भोर, बळीराम रोंगटे, रमेश निसरड आदी उपस्थित होते. ह्या निवडणुकीची चित्र काही दिवसात स्पष्ट होणार असून माघारीनंतर निवडणुकीची रंगत वाढणार आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group