प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – राजकीय मतभेद बाजुला सारुन संस्था वाढीस लागावी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध केली. यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे ऋण व्यक्त करतो असे प्रतिपादन मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी घोटी येथे केले. मुकणे ग्रामपंचायतीतर्फे खरेदी विक्री संघाचे नूतन चेअरमन माजी आमदार शिवराम झोले, व्हॉइस चेअरमन जयराम धांडे आणि गटसचिव संघटना जिल्हाध्यक्ष देविदास नाठे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, मविप्रचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, माजी आमदार तथा चेअरमन शिवराम झोले, व्हॉइस चेअरमन जयराम धांडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, खरेदी विक्री संघाचे संचालक सुनिल जाधव, गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास नाठे, निवृत्ती करवर, बाजार समितीचे माजी सभापती गणपत राव, माजी संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव आदी उपस्थित होते.
ॲड. संदीप गुळवे पुढे म्हणाले की, खरेदी-विक्री संघ उर्जितावस्थेत आणण्यासाठी सुनील जाधव यांच्यासह अनेकांच्या मदतीने प्रयत्न केल्याचा फायदा झाला. सर्वांनी राजकीय मतभेद बाजुला सारून खरेदी विक्री संघाप्रमाणेच गावोगावी निवडणुका बिनविरोध कराव्या. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, मविप्रचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, माजी आमदार शिवराम झोले यांची भाषणे झाली. ग्रामपंचायत सदस्य रामदास राव, निवृत्ती आवारी, सोसायटीचे व्हॉइस चेअरमन काळु आवारी, संचालक गणेश राव, विष्णु वेल्हाळ, गजीराम राव, जयराम राव, सुरेश आवारी, अशोक राव, मनोहर आवारी, भाऊसाहेब राव, ज्ञानेश्वर राव, पोपट वेल्हाळ, माणिक राव, भिमा शिरसाट, तानाजी बोराडे, गणेश जगदाळे, गणेश राव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रभाकर आवारी यांनी तर आभार ग्रामसेवक उमेश खैरनार यांनी मानले.