इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ राजकारण, निवडणुका, कार्यकर्ते, रणधुमाळी, जिरवाजिरवी यांचे परस्परांशी मोठे नाते आहे. मात्र ह्या नात्याला सप्टेंबरपासून चांगलेच ग्रहण लागलेले आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षाच्या लोकांनी पूर्वतयारी सुरू केली होती. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारी आरक्षण सोडत, प्रभाग रचना ह्या गोष्टी अद्यापही लांबलेल्या आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इंदिरा काँग्रेसच्या नव्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदाच्या निवडीबाबत आमची शंका असून याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आम्ही भेटून स्पष्टीकरण करणार आहोत. आमचा जन्म काँग्रेसमध्ये झाला असून मृत्यूही काँग्रेसमध्येच होईल. ५० वर्षाच्या पक्षकार्यात अनेक चढउतार पाहिले असून पक्षाला आम्हीच मजबूत केलेले आहे. ज्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, पक्षात असतांना पक्षाच्या […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी रमेश सदाशिव जाधव यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी थेट निवड करून निवडीचे पत्र दिलेले आहे. ही निवड अधिकृत असून याबाबत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे. या निवडीमुळे इगतपुरी तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. मात्र प्रदेक्षाध्यक्षांनी केलेल्या निवडीला आव्हान देण्याचे काम त्र्यंबकसारख्या संबंध […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी रामदास धांडे हेच कायम असून रमेश जाधव यांची नियुक्ती झाल्याबाबत अधिकृत पत्र काढण्यात आले नसल्याचे इगतपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून रामदास धांडे हेच सक्षम असून त्यांच्या कुशलतेने पक्षाला घवघवीत यश मिळालेले आहे. तथाकथित तालुकाध्यक्ष हे अन्य पक्षात जाऊन आलेले असल्याने […]
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नूतन तालुकाध्यक्षांचे जोरदार स्वागत इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या सानिध्यात राजकारण, समाजकारण आणि विकासाचा सुवर्णमध्य साधणारे रमेश सदाशिव जाधव यांची निवड इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी करतांना अत्यानंद होत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्यासह जेष्ठ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समन्वयाने आगामी स्थानिक स्वराज्य […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ इगतपुरी तालुक्यात प्रतिष्ठेच्या व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी गटाच्या कमल भाऊसाहेब कदम विजयी झाल्या. त्यांनी विरोधी गटाच्या ठकुबाई कदम यांचा पराभव केला. ग्रामपंचायत सदस्या रविना कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुक घेण्यात आली होती. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अवघ्या ३ मतांच्या फरकाने कमल कदम विजयी झाल्या. सत्ताधारी गटाच्या […]
निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ उभाडे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत रिक्त झालेल्या जागेवर सचिन सुरुडे ह्यांच्या रूपाने तरुण चेहऱ्याला संधी मिळाली आहे. ग्रामपंचायत सदस्य रमेश सुरुडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. विरोधी गटाकडून पूर्वाश्रमीचे विरोधक सुरेश भोर, सत्ताधारी गटाकडून मयत सुरुडेंचा मुलगा सचिन सुरुडे यांस उमेदवारी दिली होती. निवडणुकीत सुरेश भोर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील २७ टक्के आरक्षण स्थगित करण्याच्या निर्णयामुळे राज्यासह देशभरातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आलेले आहे. केंद्र सरकारने इंपिरिकल डेटा देण्यास नकार दिल्याने राज्य शासनाकडून हा डेटा गोळा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु याच कालावधीत राज्यातील अनेक जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ वंचित बहुजन आघाडीतर्फे इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समितीच्या गणांच्या सर्व जग लढवण्यात येणार आहे. ह्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडीस्वबळावर लढणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक २०२२ ह्या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण आढावा बैठक गोंदे दुमाला […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तालुका शिवसेनेचे समन्वयक समाधान बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना शिवसैनिकांनी दिले. यावेळी टायगर व्हॅली ॲग्रो अँड ईको टुरिझम रिसॉर्ट, अंबोली डॅम, वेळुंजे ( त्र्यंबकेश्वर ) येथे सेंद्रिय शेती करणाऱ्या संजय गुणाजी बोडके या शेतकऱ्याचा सन्मान नामदार दादासाहेब […]