राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी अनिता शिवनाथ काळे यांची निवड : ना. छगन भुजबळ, प्रेरणा बलकवडे, गोरख बोडके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ इगतपुरी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच अनिता शिवनाथ काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या इगतपुरी तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. ग्रामीण दुर्गम भागात राजकारण करतांना सातत्याने समाजहित आणि लोकसेवा करण्यासाठी महिला असूनही अनिता काळे यांचे योगदान अनमोल आहे. असे गौरवोद्गार राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री […]

इगतपुरी तालुक्यातील दिग्गज पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश : प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला भरगच्च प्रवेश सोहळा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक प्रबळ होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक गावात आपली पकड मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणनीती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादीकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील दिग्गज राजकीय पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई येथे भरगच्च कार्यक्रमात राष्ट्रवादी […]

जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ओबीसी ग्रामपंचायत सदस्यांकडे १ महिना मुदत शिल्लक : १६ जानेवारी नंतर सदस्यपदावर सोडावे लागणार पाणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतींसाठी १६ जानेवारी २०२१ ला सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या. यावेळी ओबीसी, एसी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढणाऱ्या व निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक विभागाकडे फॉर्म भरतांना पुढील १२ महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करू असे हमीपत्र दिले होते. मात्र ह्या निवडणुकीत निवडून आलेल्या शेकडो ग्रामपंचायत सदस्यांनी ११ महिने उलटले […]

आमचे ठरले..आमचा उमेदवार फक्त गणपत जाधव…! ; गोंदे दुमाला गावकऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे फुंकले रणशिंग

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ खरा निर्मळ विकास पाहिजे असेल तर वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटासाठी फक्त गणपत जाधव हाच उमेदवार निवडून देण्याचा निर्धार इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला ह्या मोठ्या गावाने केला आहे. तरुणाई, जेष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने गणपत जाधव यांना जिल्हा परिषदेत पाठवण्यासाठी दृढनिश्चय करण्यात आला. कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तरी अशा […]

हरसुल ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत पांडुरंग टोपले यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्युज, दि. 10 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हरसुल ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 5 मधील पोटनिवडणुकीत सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग टोपले यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 5 मध्ये अनिल बोरसे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली होती. मात्र अनिल बोरसे हे शिक्षक म्हणून सारस्ते येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्याने […]

माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवराम झोले, गोरख बोडके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शाल टाकून त्यांना राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश दिला. इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रारंभापासून हरिश्चंद्र चव्हाण राजकारणात सक्रिय होते. अतिशय कमी वयात त्यांच्याकडून समाजोपयोगी कामे झाली. त्यांच्या राष्ट्रवादीत झालेल्या प्रवेशाने इगतपुरी […]

जिकडे घुगऱ्या तिकडे पक्षांतर : अचूक वेळ साधली तरच पक्षांतराला किंमत

लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदीच तोंडावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर नव्या गट गणांची निर्मिती, राजकीय आरक्षण, महिलांचे आरक्षण ह्या प्रक्रिया अद्यापही लटकलेल्या आहेत. ह्या काळातच राजकीय सोयीसाठी नीतिमूल्ये गुंडाळून पक्षांतर जास्त वेगाने होतात. राजकारणात नेमक्या अंदाजाला मोठी किंमत असते. तो अंदाज घेऊनच पक्षांतराचा निर्णय घ्यायचा असतो. योग्य वेळी […]

शेतकरी कामगार पक्ष इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा पूर्ण ताकदीने लढवणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इगतपुरी शेतकरी कामगार पक्षाची विस्तारीत बैठक नुकतीच खेडभैरव येथे पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक व पक्षाची भुमिका यावर सविस्तर चर्चा झाली. यात सर्वानुमते जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सर्व जागा स्वबळावर संपूर्ण […]

आता मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ : राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १ भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा ५ डिसेंबर २०२१ पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली. मदान […]

नवा जिल्हा परिषद गट कोणता होणार ? कोणती गावे होतील समाविष्ट ? अन्य गटातील कोणती गावे कुठे होतील समाविष्ट ?

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची संख्या वाढवण्याचा निर्णय नुकताच झाला. इगतपुरी तालुक्यात विद्यमान परिस्थितीत ५ जिल्हा परिषद गट आहेत. या निर्णयामुळे इगतपुरी तालुक्यात एका नवीन जिल्हा परिषद गटाची भर पडणार आहे. अर्थातच पंचायत समितीचे २ गण सुद्धा वाढणार आहेत. नवा जिल्हा परिषद […]

error: Content is protected !!