रामदास धांडे हेच इंदिरा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी कायम : नूतन तालुकाध्यक्षांची निवड बेकायदा – संपतराव सकाळे : निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी रामदास धांडे हेच कायम असून रमेश जाधव यांची नियुक्ती झाल्याबाबत अधिकृत पत्र काढण्यात आले नसल्याचे इगतपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. इगतपुरी तालुकाध्यक्ष म्हणून रामदास धांडे हेच सक्षम असून त्यांच्या कुशलतेने पक्षाला घवघवीत यश मिळालेले आहे. तथाकथित तालुकाध्यक्ष हे अन्य पक्षात जाऊन आलेले असल्याने ही निवड काँग्रेस पक्षाच्या नियमाला धरून नाही. यासह नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार शेवाळे यांनाही अंधारात ठेवून घाईघाईत निवड केल्याचे भासवण्यात आले. वास्तविक निवडीचे पत्र नसून काढलेला फोटो नियमित स्वागत म्हणून काढलेला आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काँग्रेस पक्षात प्रवेश नसलेल्या राष्ट्रवादीच्या व्यक्तीला पद कसे मिळू शकते असा प्रश्न उपस्थित झाला असे इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी पत्रकारांना सांगितले.

श्री. सकाळे यांच्यासह काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्दनमामा माळी, कमलाकर नाठे आदी कार्यकर्त्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी रामदास धांडे हेच कायम असून त्यानी इगतपुरी तालुक्यात काँग्रेस पक्ष बळकट केलेला आहे. ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्याने तेच इगतपुरी तालुक्यात तालुकाध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षासाठी काम करतील असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याप्रकरणी लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे आहोत संपतराव  सकाळे यांनी सांगितले. ह्या बैठकीत रामदास धांडे यांना त्यांचे काम अखंड सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कचरू पाटील शिंदे , ॲड जी. पी. चव्हाण, लकी जाधव, कमलाकर नाठे, ज्ञानेश्वर कडू, साहेबराव धोंगडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!