देवा मोरे, गणपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी मनीषा दिनकर गायकर यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

इगतपुरी तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नांदगाव बुद्रुक ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी मनीषा दिनकर गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. लोकनियुक्त सरपंच देवा मोरे आणि वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील झंझावाती विकासाचे शिल्पकार तथा गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव यांच्या संकल्पनेतून उपसरपंच निवडणूक बिनविरोध झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या ह्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. गणपत जाधव यांनी यावेळी सांगितले की, नांदगाव बुद्रुक हे गाव आणि ग्रामस्थ विकासाभिमुख असून ग्रामपंचायत पदाधिकारी सुद्धा सक्षमतेने कार्य करतात. आगामी काळात ह्या गावासाठी निश्चितच चांगले काम उभे करण्यासाठी शब्द देतो. ह्या निवडीचे संपूर्ण नांदगाव बुद्रुक आणि परिसरात सुद्धा स्वागत करण्यात आले.

नांदगाव बुद्रुक ग्रामस्थांनी खेळीमेळीच्या वातावरणात मनीषा गायकर यांना बिनविरोध निवड करून उपसरपंचपदी विराजमान केले. सरपंच देवा मोरे आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य अतिशय क्रियाशील आहेत. त्यांना मी केलेल्या सूचनेनुसार बिनविरोध निवडीची परंपरा जपली गेली. ह्या गावासाठी आगामी काळात भरीव कार्य करण्याचा मी शब्द देतो.

- गणपत जाधव, माजी सरपंच गोंदे दुमाला

उपसरपंच निवडीसाठी बोलावलेल्या विशेष बैठकीत लोकनियुक्त सरपंच देवा मोरे यांनी अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम गायकर, अशोक गायकर, दत्तू पावडे, मंगला कोकाटे, अरुण शिरसाठ, लता शिरसाठ हे निवडणूक बैठकीत उपस्थित होते. निवडीची घोषणा होताच ग्रामस्थ हिरामण गायकर, माजी सरपंच भाऊसाहेब गायकर, विलास मुसळे, दिनकर गायकर, सुभाष गायकर, नामदेव कोकाटे, ज्ञानेश्वर गायकर, नाना त्र्यंबक गायकर, तानाजी मुरलीधर गायकर, योगेश पाळदे, उत्तम पाळदे, निखिल पागेरे, विलास पागेरे, उत्तम पांडू गायकर, माजी सरपंच तुकाराम गायकर , ज्ञानेश्वर महादू गायकर, दादा शिरसाठ, दत्तू गायकर, बन्सी जाधव विष्णू पागेरे, विठोबा संधान, एकनाथ मुसळे आदींनी जल्लोष केला. याप्रसंगी गोंदे सोसायटीचे माजी चेअरमन विजय नाठे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सोनवणे, हिरामण नाठे आदींनी नवनियुक्त उपसरपंच मनीषा गायकर यांचे अभिनंदन केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!