रमेश जाधव यांची तालुकाध्यक्षपदी झालेली निवड प्रदेक्षाध्यक्षांनी केली असल्याने अधिकृतच ; अन्य तालुक्याच्या तालुकाध्यक्षांना राज्यस्तरीय निर्णयात हस्तक्षेपाचा अधिकार कोणी दिला ?- ॲड. संदीप गुळवे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इंदिरा काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी रमेश सदाशिव जाधव यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी थेट निवड करून निवडीचे पत्र दिलेले आहे. ही निवड अधिकृत असून याबाबत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे. या निवडीमुळे इगतपुरी तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. मात्र प्रदेक्षाध्यक्षांनी केलेल्या निवडीला आव्हान देण्याचे काम त्र्यंबकसारख्या संबंध नसलेल्या अन्य तालुक्यातील तालुकाध्यक्षांनी करू नये. प्रदेक्षाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयानुसार रमेश सदाशिव जाधव हेच अधिकृत आणि सर्वमान्य तालुकाध्यक्ष असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांनी केली आहे. सर्वांना सोबत घेऊन जनविकासाचे ध्येय आणि पक्षाची विचारधारा घराघरात नेण्यासाठी तालुकाध्यक्षपदाच्या माध्यमातून अविरत कटिबद्ध असल्याचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष रमेश सदाशिव जाधव यांनी इगतपुरीनामा प्रतिनिधीसोबत बोलतांना सांगितले.

इंदिरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्व. गोपाळराव गुळवे यांचे खंदे समर्थक गोंदे दुमालाचे माजी सरपंच रमेश सदाशिव जाधव यांची काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी निवड केलेली आहे. या निवडीबाबत त्र्यंबकचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे आदींना काहीही अधिकार नसतांना त्यांनी नव्या निवडीबाबत विनाकारण संभ्रम निर्माण केलेला आहे. मुळात राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून रमेश जाधव यांची निवड केलेली आहे. संपतराव सकाळे हे अन्य तालुक्याचे तालुकाध्यक्ष असताना त्यांनी इगतपुरीचा तालुकाध्यक्ष कोण ह्यावर अजिबात भाष्य आणि ढवळाढवळ करू नये. स्थानिक प्रकरणात सहभाग घेऊ नये. रमेश जाधव यांची निवड प्रदेश स्तरावरील अधिकृत निवड असून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी याबाबत दुजोरा दिलेला आहे. ह्या प्रकरणी कोणाला अधिकार नसतांना विनाकारण पक्षात दुफळी निर्माण होईल असे वातावरण निर्माण करू नये. प्रदेश कार्यालयाचा अधिकृत आदेश आणि निवडीचे पत्र याबाबत आपली खात्री करूनच माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी असेही काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांनी सांगितले. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!