
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ४ मधून शिवसेना धनुष्यबाण पक्षाची उमेदवारी समर्थ नेतृत्व जेष्ठ समाजसेवक अर्जुन खंडू खातळे हे करीत आहेत. त्यांच्या दणदणीत विजयासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. प्रभाग ४ चा शाश्वत आणि निरंतर विकास करण्यासाठी अर्जुन खंडू खातळे हे सुयोग्य व्यक्तिमत्व आहे. एसटी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून कामगारांच्या हक्कांसाठी त्यांची भूमिका प्रभावी राहिली आहे. प्रभागाच्या विकासासाठी त्यांच्या नावाला पहिली पसंती मिळत असून ते भरभरून मतांनी विजयाचा झेंडा फडकवतील असे प्रभागात बोलले जाते आहे. नागरिकांनी नगरसेवक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून २ डिसेंबरला त्यांच्या धनुष्यबाण निशाणीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिक करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन खातळे हे सामाजिक आणि प्रभागाच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रभागातील नागरिकांनी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आग्रह केला होता. नागरिकांना प्रतिसाद देत अर्जुन खातळे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शपथबद्ध असल्याचे सांगितले आहे.
“प्रभाग ४ मधील मूलभूत समस्या, विशेषतः पिण्याचे पाणी, रस्ते आणि स्वच्छता यावर माझे मुख्य लक्ष असेल. नागरिकांच्या पाठिंब्याने प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन” असे मत अर्जुन खातळे यांनी व्यक्त केले. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील अन्य उमेदवारांचे धाबे दनाणले आहे. अर्जुन खातळे शिवसेनेचे ज्येष्ठ अनुभवी कार्यकर्ते असून शिवशक्ती युवक मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष आहेत. शिवसेना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. सामाजिक क्षेत्रात तसेच वारकरी संप्रदायात त्यांचे कायम सक्रिय व उल्लेखनीय योगदान असते. विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, इगतपुरीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या एकनिष्ठतेने व तत्परतेने सांभाळल्या आहेत. यासह शेती, कामगार संघटना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अमूल्य व प्रेरणादायी आहे. त्यामुळेच प्रभाग ४ मधून नगरसेवक पदाला अर्जुन खातळे हे न्याय देणार असल्याने त्यांचा विजय एकतर्फी होणार असल्याचे दिसते.