भूलथापा, खोटी आश्वासने देणाऱ्यांना इगतपुरीकर घरी बसवतील – राष्ट्रवादी नेते फिरोज पठाण : विविध समस्या सोडवून इगतपुरीला विकसित करण्यास कटीबद्ध

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – गेली तीन दशके इगतपुरी शहरात आणि प्रभाग ६ मधील नागरिकांसमोर अनेक समस्या व अनेक प्रश्न आ वासून उभे ठाकलेले आहेत. लोकांसाठी महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे असणारे अनेक प्रश्न अधांतरी आहेत. प्रभागातील आणि शहरातील विविध प्रश्न, न सुटणाऱ्या अनेक समस्या निवडून आल्यावर तातडीने सोडवण्यासाठी मी वचनबद्ध आहे. इगतपुरीकर नागरिकांना केंद्रिभूत मानून प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक काम फक्त फक्त विकासाचेच असेल याची मी ग्वाही देतो. प्रभाग ६ मधील माझे परमेश्वरस्वरूप मतदार मला भरभरून मतांचे दान नक्की देणार आहेत. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानात माझ्यासह आमचे सगळे उमेदवार विजयी होतील असा दृढविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ पक्षाचे उमेदवार तथा प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, इगतपुरीकर जनता आता जागरूक झाली आहे. पोकळ वलग्ना आणि पोकळ आश्वासन यांना आमचे मतदार अजिबात भुलणार नाहीत. विकसित इगतपुरीचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व सुयोग्य उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. लोकांचा विश्वास आम्हाला सार्थ ठरवायचा आहे. निवडून आल्या आल्या दिलेले शब्द पूर्णत्वाकडे नेण्याची आमची क्षमता आहे. प्रभाग ६ मधील नागरिक आणि सर्व इगतपुरीकरांना विकासाची मधुर फळे देण्यासाठी आम्ही कृतिशील आहोत. या निवडणुकीत विविध प्रकारच्या भूलथापा, खोटी आश्वासने देणाऱ्यांना माझे सुजाण इगतपुरीकर नागरिक अजिबात थारा देणार नाहीत. यामुळेच प्रभाग ६ सह, थेट नगराध्यक्ष पद आणि सर्व जागांवर आमचा विजय निश्चित असल्याचे फिरोज पठाण यांनी सांगितले.

error: Content is protected !!