इगतपुरी शहराची भरभराट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या हातात सत्तेच्या चाव्या द्या – शिवसेना नेत्या प्रा. सुषमा अंधारे 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी हे निसर्गाने वरदान दिलेले जागतिक दर्जाचे नामांकित शहर आहे. ज्या पक्षामुळे तीस वर्ष राजकारण करून ज्यांनी सत्ता भोगली ते लोक अन्यत्र जाऊन निवडणूक लढवत आहे. कारण निवडणूक आयोग भाजपाचा घरगडी म्हणून काम करतोय. इगतपुरी शहराची भरभराट करण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शुभांगी यशवंत दळवी आणि शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शप आणि महाविकास आघाडी वचनबद्ध आहेत. आम्ही दिलेले सर्व उमेदवार आपल्यातले सामान्य माणसे आहेत. इगतपुरीला खड्ड्यात गाडणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी २ डिसेंबरला इगतपुरीकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी गर्जना शिवसेना नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी इगतपुरी येथे केली. इगतपुरी नगरपरिषद निवडणुक महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. इगतपुरी शहराला नवी दिशा देण्यासाठी इगतपुरीकरांनी महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देणे निश्चित केले असल्याचे काँग्रेस नेते लकीभाऊ जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, शिवसेना नेते निवृत्ती जाधव, इगतपुरी काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, काँग्रेस नेते आकाश पारख, निवृत्ती कातोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, शहरप्रमुख नवल सोनार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, भाऊसाहेब खातळे, शिवसेना उपशहरप्रमुख संदीप शर्मा, समीर यादव, यांच्यासह शेकडो पदाधिकारी यावेळी हजर होते. उमेदवार भूषण जाधव, सुरेखा चंद्रमोरे, राजू पंचांरिया, विष्णू डावखर आदी उपस्थित होते. 

error: Content is protected !!