
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीतील शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि रिपब्लिकन सेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शालिनीताई संजय खातळे आणि अन्य सर्व उमेदवारांच्या उद्या शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री ना. हसन मुश्रीफ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार हेमंत गोडसे यांची प्रचार सभा होणार आहे. इगतपुरी येथील नर्मदा लॉन्स येथे सकाळी दहा वाजता ह्या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ह्या प्रचारसभेला शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि रिपब्लिकन सेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.