येऊन येऊन येणार कोण? शालिनीताई खातळे यांच्याशिवाय आहेच कोण..! : इगतपुरी शहरभर धनुष्यबाण आणि घड्याळ निशाणीची चलती

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आवाज कुणाचा? शिवसेनेचा..!, येऊन येऊन येणार कोण? शालिनीताई खातळे यांच्याशिवाय आहेच कोण..! शालिनीताई तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..! अशा अनेक घोषणा इगतपुरी शहराच्या कानाकोपऱ्यात गुंजत आहेत. शिवसेना धनुष्यबाण, राष्ट्रवादी घड्याळ व रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शहर पिंजून काढले आहे. इगतपुरीत आता परिवर्तन होणे अटळ असून शहराला ३० वर्ष मागे नेणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे. धनुष्यबाण निशाणी घेऊन सौ. शालिनीताई संजय खातळे ह्या नगराध्यक्ष पदासाठी झुंजार उमेदवार ठरत आहे. त्यांच्यासह सर्व उमेदवार सक्षम असल्याने मतदार बंधू भगिनी इगतपुरीत परिवर्तन घडवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासाच्या नावाने शंखोबा असणाऱ्या विरोधकांच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना अनेक भागात मतदारांनी आमच्या दारात पाऊल ठेवायचं नाही अशी तंबी दिल्याचे शहरभर पसरले आहे. आम्ही शालिनीताई संजय खातळे आणि त्यांच्या उमेदवारांना संधी देणार असून तुम्ही पुन्हा आमच्याकडे येऊ नका अशीही चर्चा आहे. इगतपुरी शहर आदर्श, समृद्ध, उन्नत आणि विकसित करण्यासाठी प्रत्येक क्षण बांधील राहू असे सौ. शालिनीताई संजय खातळे यांनी सांगितले.

error: Content is protected !!