सुरेखा चंद्रमोरे व भूषण जाधव यांच्यासाठी प्रभाग ४ च्या नागरिकांनी हातात घेतला प्रचार : अक्षरशः पदरमोड करून निवडणुकीसाठी काढली लोकवर्गणी  

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – राजकारण आणि निवडणूक म्हणजे भला मोठा खर्च.. या खर्चामुळे चांगले काम करणारी सामान्य माणसं यापासून चार हात लांब राहतात. पण चांगली माणसे सुद्धा नगरसेवक व्हायला पाहिजे. यासाठी इगतपुरीतील प्रभाग ४ मधील सुरेखा दिनकर चंद्रमोरे यांच्यासाठी सामान्य नागरिक पुढे सरसावले आहेत. सुरेखा चंद्रमोरे यांना नगरसेवक म्हणून पाठवण्यासाठी लोकांनी आपली स्वतःची पदरमोड करीत लोकवर्गणी काढली आहे. यासोबतच त्यांचा सूक्ष्म प्रचार घरोघरी जाऊन स्वतःच नागरिक पुढे होऊन करीत आहेत. त्यांच्यासोबत सामान्य युवकांचा बुलंद आवाज असणारे भूषण प्रभाकर जाधव हे सुद्धा निवडणुकीत उतरलेले आहेत. शिवसेना उबाठा पक्षाने त्यांना संधी दिली आहे. सामान्य नागरिकांनी सुरेखा चंद्रमोरे, भूषण जाधव यांच्या मशाल ह्या चिन्हाला मतदान करण्यासाठी कंबर कसल्याचे भूषणावह चित्र आहे. सामान्य माणसांचा बुलंद आवाज बनून सुरेखा चंद्रमोरे आणि भूषण जाधव हे इगतपुरी नगरपरिषदेत नगरसेवक व्हावेत ही सामान्य माणसांची इच्छा आहे.

सुरेखा दिनकर चंद्रमोरे या शिवसेनेच्या मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. इगतपुरी परिसरातील शेतमजुरी, निंदनी, आवणी, खुरपणी, काढणी अशी कामे त्या कायम करत आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अफाट जनसंपर्क आहे. त्यांचे पती सामान्य रिक्षाचालक असून त्यांच्याकडून सुद्धा लोकांची सेवा कायम घडत असते. दुसरे उमेदवार भूषण प्रभाकर जाधव हा युवा चेहरा प्रभाग ४ मधील अत्यंत प्रभावशाली चेहरा आहे. त्यांचे सामाजिक कार्य आणि त्यांनी उभी केलेली संपर्क यंत्रणा तोंडात बोट घालणारी आहे. दोघेही उमेदवार सामान्य माणसांच्या कुटुंबातील आहेत. निवडणूक खर्चासाठी ह्या प्रभागातील नागरिकांनी अक्षरश: लोकवर्गणी काढली आहे. स्वतःची भाकरी, भाजी रुमालात बांधून नागरिकांनी त्यांचा प्रचार हातात घेतला आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडून त्यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले असल्याने नागरिकांमध्ये ते पोहोचले असल्याचे दिसते. यामुळे दोघा उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रत्येक क्षण सोबत राहून ऋणातून उतराई करण्याचा प्रयत्न करू. नगरसेवक म्हणून अद्वितीय कामगिरी करून लोकांचा विश्वास सार्थ ठरवू अशा भावना सुरेखा चंद्रमोरे, भूषण जाधव यांनी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!