एकदम झकास : मानवेढे ग्रामपंचायतीने बनवले २ एकरात उत्तर महाराष्ट्रातील अव्वल क्रिकेट मैदान : सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे यांच्याकडून गावाला अनोखी भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ छंदाला अजिबात मोल नसते. आपली हौस भागवण्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करण्याची अनेकांची तयारी असते. यामध्ये अनेकजण सामाजिक कार्य करतांना छंद आणि क्रीडा प्रकाराला विविध साहाय्य करीत असतात. मात्र त्यामध्ये शाश्वत सुविधा नसल्याने तात्कालिक मदत फक्त होत असते. कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम होण्याकडे नेहमीच कल असणारी इगतपुरी तालुक्यातील मानवेढे ही ग्रामपंचायत ओळखली […]

घोटी येथील खेळाडूंचे कराटे बेल्ट परिक्षेत यश

सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १ नुकत्याच टीएस शोतोकान कराटे डो इगतपुरी तालुका संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या बेल्ट परिक्षेत घोटी येथील ग्रामीण विद्यार्थ्यांनी दमदार खेळ करीत विविध प्रकारचे कलर बेल्टची लयलूट केली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे ॲड. जयदेव रिके, बजरंग मराडे, सदानंद भटाटे, योगेश गोरे यांच्या हस्ते बेल्टचे वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून सेन्साई शेखर […]

माधुरी साबळे हिची पुणे विद्यापीठ विभागीय खो-खो स्पर्धेत निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ त्र्यंबकेश्वर येथील मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील कु. माधुरी साबळे या विद्यार्थिनीची क. का. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदोरी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन खो- खो स्पर्धेतुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागिय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही आंतरविभागीय स्पर्धा प्रतिक्षा कॉलेज ऑफ कॉमर्स, चिंचवड, पुणे येथे होणार आहे. या […]

स्टुडंड ऑलम्पिक असोसिएशन स्पर्धेत किशोर पाटोळेचे घवघवीत यश आणि नॅशनल स्पर्धेसाठी निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ सिन्नर तालुक्यातील आशापुर टेंभूरवाडी येथील सामान्य शेतकरी सुभाष पाटोळे यांचा मुलगा किशोर पाटोळे याने सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या स्टुडंड ऑलम्पिक  असोसिएशन या धावण्याच्या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकावत राज्यामध्ये तालुक्यासह गावाचे नाव उंचावल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे.या स्पर्धेत त्याला […]

हरसूल येथे स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2021 टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा : विनायक माळेकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्युज, दि. 25  त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल बारीपाडा येथे संघर्ष क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या स्व. राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आज पार पडले. युवा नेते इंजि. विनायक माळेकर, मिथुन राऊत, हरसुलचे माजी सरपंच नितीन लाखन, उपसरपंच राहुल शार्दुल, हिरामण गावित, माजी उपसरपंच अखलाक शेख, माजी सरपंच जनार्दन पारधी, जेष्ठ नेते […]

योगासने काळाची गरज – नानासाहेब महाले : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगासने स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ प्राचीन काळापासून साधूसंतांनी योगासनाला महत्त्व दिले. योग साधना, योगविद्या, ध्यानधारणा यांचे महत्त्व असून वेगवेगळ्या आजारांवर प्रभावी ठरते आहे. योगाचे शिक्षण देण्याचे काम प्राचीन परंपरेमुळे असल्याने विद्यार्थ्यांनी योगासने व त्यातील स्पर्धांचे ज्ञान घ्यावे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनमान प्रचंड बदलले म्हणून मनःशांती साठी योगाशिवाय पर्याय नाही. योगामुळे बलवान सौंदर्य व आंतरिक सौंदर्य […]

नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धा इगतपुरीत संपन्न

इगतपुरीनामा न्युज, दि. १२ विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आपला शारीरिक व मानसिक क्षमतेचा विकास साधून खिलाडू वृत्ती आत्मसात करावी. यासह खेळामध्ये प्राविण्य मिळवून चांगले करिअर घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिक जिल्हा आंतर महाविद्यालयीन मुलींच्या हॉलीबॉल […]

47 व्या महाराष्ट्र स्टेट रोईंग चॅम्पियन पंकज वड याचा हरसुलकरांकडुन सत्कार

इगतपुरीनामा न्युज, दि. 7  पंकज वड याने अनिकेत तांबे सोबत रोइंगमध्ये चंदेरी कामगिरी केली. हरसूल क्रिकेट संघाचा ऑल राऊंडर पंकज वड याची राष्ट्रीय रोईंग  स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. पंकजने पुणे युनिव्हर्सिटीमधून खेळत ओपन गटातून सांघिक गोल्ड आणि सिल्व्हर मेडल मिळवले. महाराष्ट्र स्टेट कडून त्यांची नॅशनलसाठी निवड झाली आहे.नाशिक येथे NWSA या क्लब कडून पंकजा सराव […]

जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांच्या संकल्पनेतून सारस्तेत भव्य मॅरेथॉन स्पर्धा : महाराष्ट्रभरातुन हजारो स्पर्धकांचा सहभाग

राहुल बोरसे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सारस्ते येथे हरसुल जिल्हा परिषद गटाच्या सदस्या इंजि. रुपांजली विनायक माळेकर यांच्या सौजन्याने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातुन हजारो स्पर्धक सहभागी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर, जिल्हा […]

मॅरेथॉन स्पर्धा निरामय आरोग्यासाठी बहुगुणी – गिर्यारोहक भगीरथ मराडे : उंबरकोन येथे इगतपुरी तालुकास्तरीय शहीद मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ मॅरेथॉन स्पर्धा निरामय आरोग्यासाठी बहुगुणी आहेत. ह्या स्पर्धांतून सदृढ युवापिढी आणि देशाला उत्तमोत्तम खेळाडू लाभतात. शहिदांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी माजी सैनिक भाऊसाहेब बोराडे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा सर्वांना प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन कळसुबाई मित्रमंडळाने अध्यक्ष प्रसिद्ध गिर्यारोहक भगीरथ मराडे यांनी केले. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ […]

error: Content is protected !!