कुशेगाव येथील प्रियंकाने पिंच्याक सिलॅटमध्ये पटकावला तिसरा क्रमांक : आर्थिक दुर्बल कुटुंबातील प्रियंकाला आर्थिक सहाय्याची गरज

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30

प्रियंका कृष्णा सोनवणे ही नाशिक जिल्ह्यातील कुशेगाव या ग्रामीण भागात राहत असून घरातील परिस्थिती हलाखीची आहे. तिने त्यावर मात करून महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा २०२२ मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. तिने प्रथमच या पिंच्याक सिलॅटमध्ये प्रवेश घेतला होता. अनेक विभागातील खेळाडूंवर मात करून प्रियंका हिने तिसरा क्रमांक पटकावला. यामुळे तिचे सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे. तिच्यामुळे इगतपुरी तालुक्यातील कुशेगावचे नाव गौरवले आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रियंका कृष्णा सोनवणे आता पुढील स्पर्धेस कसून तयारी करत आहे. मी आता पुढील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपले, आपल्या परिवाराचे व आपल्या गावाचे नाव उंचावणार असा आशावाद तिने व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सध्या तिची तयारी सुरू आहे परंतु आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. तिची आई गिरणीच्या पट्ट्यात साडी अडकल्याने काही वर्षांपासून जागेवरच बसून आहे. तर वडील भट्टीच्या कंपनीत कामाला आहेत. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!