महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेचे यजमानपद मुरंबी गावाला : ज्ञानेश्वर लहाने, भगवान जुंदरे आदींच्या बैठकीत झाला निर्णय

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12

आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 च्या नियोजनासाठी इगतपुरी तालुका केसरी निवड चाचणीसाठी इगतपुरी येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ग्रँड परिवार येथे चाचणी स्पर्धेच्या नियोजनासाठी ही बैठक पार पडली. खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या ह्या बैठकीमध्ये मुरंबी गावातील ग्रामस्थांनी स्पर्धा भरवण्याची मागणी केली. त्यानुसार 27 नोव्हेंबरला होणाऱ्या स्पर्धेसाठी मुरंबी गावाला चाचणी स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. तालीम संघाचे उपाध्यक्ष पै. भगवान जुंदरे यांनी सांगितले की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी इगतपुरी तालुक्यातील स्पर्धक तयारीमध्ये आहेत. इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांच्या मौलिक मार्गदर्शनाने यश मिळवण्यासाठी सूत्रबद्ध नियोजन केले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कुस्तीगीर तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रघुनाथ तोकडे, तालीम संघाचे कार्याध्यक्ष अविनाश सहाणे, गोरख सहाणे, गोटीराम चव्हाण, सुनील कोकणे, दत्तुपाटील जुंदरे, वस्ताद दालभगत, सागर झनकर, कुणाल वाडेकर, सुनिल मते, आकाश शिंदे, केशव गतीर, काळु तोकडे, वस्ताद विश्वनाथ भगत, अजित नालबंद, सोमनाथ घारे आदी उपस्थित होते. जिल्हा चाचणी स्पर्धेचे सिन्नर येथे 3 आणि 4 डिसेंबरला नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली. स्पर्धेच्या तयारीसाठी इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, उपाध्यक्ष भगवान जुंदरे आदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली काम सुरु करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांनी दिलेल्या वेळेनुसार वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!