मोडाळे येथील सर्व शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि क्रिकेट, हॉलिबॉलसाठी आधुनिक क्रीडांगणाचे काम सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावी सर्व शासकीय इमारतींवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्वाकांक्षी काम सुरु करण्यात आले आहे. यासह क्रिकेट आणि हॉलिबॉल खेळण्यासाठी आधुनिक स्वरूपात क्रिडांगण निर्मित करण्याचा आज शुभारंभ करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या प्रयत्नांनी नमामी गोदा फाउंडेशन आणि चिन्मय दादा फाउंडेशन यांच्या वतीने हा मोलाचा उपक्रम आज कार्यान्वित करण्यात आला.

नमामी गोदा फाउंडेशन आणि चिन्मय दादा फाउंडेशन यांच्या वतीने जनहितार्थ रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाचे भूमिपूजन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर, श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद, अध्यक्ष राजेश पंडित आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख यांनी संबंधित संस्थांचे गावकऱ्यांतर्फे ऋण व्यक्त केले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!