जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने : हे संजया… तुझ्या आरोग्याचे आणि प्रसिध्द होण्याचे रहस्य काय आहे ?

लेखन : संजय पवार, सायकलिस्ट, नाशिक

संजय पवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आदिवासी  भागात माध्यमिक ध्येयवेडा कलाशिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळवली. संजय लहान पणापासून सायकलचा पुजारी, वडिलांची सायकल होती लंगडी, लंगडी खेळताना सायकलींची सुरुवात झाली. सौंदाणे गावात लहानाचा मोठा झाला. लहानपणीच सायकलचा छंद गावात अन्सार व निसारचे सायकल दुकान होते. 50 पैसे तास सायकल असायची. अन्सार निसार हे वडिलांचे मित्र.. मी 50 पै तासाने लहान सायकल घेतली की दिवसभर फरार..! मला पाहण्यासाठी अन्सारच्या चार साईकली. पण मी काही दिवसभर सापडत नसे अन्सारकडून वडिलांना भेटून माझी शोध मोहीम सुरु व्हायची…

माझी सायकल प्रत्येक शिवारात पळत असत. रस्तेही खराब होते. अन्सार व वडिलांना प्रत्येक शिवारात निरोप लागायचा की एक लहान मुलगा एक तासापूर्वी गेला पण मी दुसऱ्या शिवारात असायचो. जवळपास 6 तास सायकलिंग करून दमायचो. मग मलाही निरोप लागायचा. वडील व अन्सार शोधत आहेत. मग धावपळ करत मारुती मंदिरा शेजारी लपत-छपत सायकल आणायची. दुकानाजवळ सायकल दुरून सोडायची आणि धूम ठोकायची. मागे वळून सुद्धा बघायचे नाही. संध्याकाळी वडिलांचा महाप्रसादाचा कार्यक्रम असायचा. या सायकलच्या छंदा मुळे म्हणा वागणुकीमुळे अन्सार मला कधीच सायकल देत नसे. मी पण सायकल प्रेमी होतो. मित्राच्या नावाने सायकल घेऊन पुन्हा फरार. मग काय संध्याकाळी मित्राची सुद्धा धुलाई आणि माझी ही धुलाई ठरलेली. लहानपणीच सायकलीवर लांब कुठेतरी जाव फिरायला असं वाटत असे ती इच्छा वयाची चाळीशी ओलांडल्या नंतरपुर्ण होत आहे.

असा हा माझा सायकलचा प्रवास शिक्षण झाल्यानंतर 1994 नाशिक येथे स्क्रीन पेन्टिंग, फोटोग्राफी, टपारिया टूल कंपनीमध्ये लागल्यानंतर सायकल घेतली. तिच्यावर दररोज 50 किमी सायकल प्रवास असायचा. 1997 मध्ये श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालय कोशिंबे येथे कला शिक्षक म्हणून रुजू झालो. तेही पगारी काम करणारा मी बिनपगारी झालो. कारण त्यावेळेस आमच्या शाळेला अनुदान नव्हते. तेथेही मी स्वस्थ बसलो नाही. मोठ्या भावाने कॅमेरा घेऊन दिला. कोशिंबे दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गाव कोशिंबे परिसरात आठ ते दहा पाढे त्याकाळात फोटोग्राफर कोणीही नव्हता आणि योगायोगाने मी पण बिन पगारी. माझा उपक्रम सुरू झाला. अगदी डॉक्टर प्रमाणे जसे डॉक्टर गावांना व्हिजिट देत असत असा माझा उपक्रम सुरू झाला. मीही प्रत्येक गावाला फोटोग्राफीसाठी जाऊ लागलो सुरुवातीला पा
पायपीट करुन फोटोग्राफी केली. पुन्हा सायकलीची साथ मिळाली. वेळ वाचू लागला 5 वर्षे सायकलवर फोटोग्राफी केली  तेही दररोज, बिनपगारी होतो पण थोडा पैसा हातात येऊ लागला.

2014 पासून नासिकला आल्यानंतर व्यायाम म्हणून सायकल सुरू केली. तिचे रूपांतर छंदात कधी झाले ते कळलेच नाही. फेसबुक मित्र धर्मराज जगदाने यांच्याशी फेसबुकवर माझी मैत्री झाली. त्यांच्या पोस्ट पाहून मी प्रभावित झालो  मलाही वाटू लागले की आपण सुद्धा ग्रीन जर्सी, हेल्मेट घालून सायकलिंग  करावी. धर्मराजाच्या पोस्ट पाहून मी अत्यंत प्रभावित झालो होतो. माझ्यातील सायकलिस्ट बाहेर आला… 2016 मध्ये वीस हजाराची सायकल घेतली आणि तेथून  घोडदौड सुरू झाली. मी एनआरएमचा राइड केल्या. अल्पावधीत सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लॅटिनियम रार्डर्सचा मानकरी झालो. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष प्रवीण खाबिया यांच्या काळात सायकलिंगची भरारीला सुरुवात झाली. सायकलची भूक वाढत गेली. मी 100 ते 200 किमी सायकलिंग करू लागलो. सौंदाणे गावी सायकलने प्रवास सुरू झाला  शाळेत पण सायकलने प्रवास करू लागलो. जगातील जगप्रसिद्ध सुपर रैर्डोनीअर्सचा किताब मिळवला. माझ्यातील सायकलिस्ट पूर्ण जागृत झाल्याने अनेकांच्या प्रेरणा व जिद्दीच्या जोरावर कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन झालो. पानिपत ते नासिक नऊ दिवसात 36 सायकलिस्टस यांनी चौदाशे किमी अंतर पार केले. शेगाव वारीची सुरुवात करून चार वेळा शेगाव झाले. पंढरपूर पाच वेळा जाऊन आलो. अष्टविनायक 850 किमी राईड केली. शिवनेरी, आळंदी, शिर्डी अशा अनेक देवस्थानाच्या राईड  केल्या. आमच्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शन आंदोलनासाठी नासिक ते मुंबई आजाद मैदान 250 किमी रात्रभर सायकलिंग केली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा सभासद झाल्यानंतर प्रत्येक राइडच्या उपक्रमात भाग घेत राहिलो  समाजोपयोगी कार्य सुरू झाले आणि ओळख वाढत गेली. फक्त सायकलमुळे आज मी नाशिकच नाही तर भारतभर सायकलिस्ट,रनर्स, ट्रेकर्स याच्याशी चांगली मैत्री झाली  त्यांच्याशी वारंवार माझा संवाद होत असतो.

आज माझे स्ट्रावा रेकॉर्डप्रमाणे 30 हजार सायकलिंग झाले आहे. त्याच्या विरहित स्ट्रावा व किमी गणना रेकॉर्ड अँप  मोबाईल नसल्यामुळे चाळीस हजारच्या वर सायकलिंग झाली असणार. आत्ता सध्या रेकॉर्ड व अनरेकॉर्ड एक लाखाच्या जवळपास सायकलिंग झाली आहे. या सायकलने मला खूप काही दिले. माझ्या शाळेसाठी मदत मिळाली. माझे आरोग्य मला मिळाले. माझी पत्नी, मुलगी हे पण  सायकलिंग करू लागले. फेसबूक ,इंस्टाग्राम, व्हाट्सअप माझ्या सायकलिंगच्या सततच्या पोस्टमुळे अनेक नवीन मित्र मिळालेत. सायकल हीच ओळख झाली. नाशिक जिल्ह्यातील शिक्षक मला सायकलिस्ट म्हणून ओळखू लागले. अनेकांनी प्रेरणा घेऊन सायकली घेतल्या. सायकलमुळे पूर्ण परिवार फिट झाला. कोरोनाच्या काळात आम्हाला कोरोना होऊनही एक रुपया ही खर्च आला नाही. हे सर्व फक्त सायकलिंगमुळे झाले. सायकलीचे उपकार आयुष्यात कधीही फेडू शकत नाही. सायकलचे खूप फायदे झाले. व्यसन जडावे तर आरोग्याचे, सायकलिंगचे लोकांना दारू, तंबाखू, सिगारेटचे व्यसन लागते  आम्हाला सायकलीचे व्यसन लागले. दररोज सायकलिंग केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. सायकलीने मानसिक, शारीरिक व्यायाम खूप छान होतो. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते  आज सायकलमुळे माझा खूप मोठा मित्र परिवार वाढला आहे. महाराष्ट्रातील नावलौकिक असलेल्या नासिक सायकलिस्ट फाउंडेशनवर संचालक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. एनआरएम रायडर एनआरएमटीम वर काम करू लागला. नवीन लोकांना जोडण्याचा छंद जडला. सायकलींचे महत्त्व मी सर्वांना पटवून देऊ लागलो. त्याचे फायदेही लोकांना समजून देऊ लागलो. लोकही आपोआप मला जवळ करू लागले आणि माझे ब्रीद वाक्य तयार झाले सायकल हीच ओळख, सायकल हाच धर्म, म्हणून सायकल धर्म वाढवूया,
हम फिट तो इंडिया फिट याही पुढे भविष्यात सायकलिंगमध्ये खूप मोठी भरारी घेण्याचा मानस आहे आणि ती घेण्याची तयारीही सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!